रेल्वे प्रशासनाने रेल नीरच्या विक्रीवर आळा घातला

उन्हाळा सुरू झाला असल्याने नागरिकांची तहान वाढली आहे. प्रवासात पाणी खरेदी करण्याचे प्रमाण चांगलेच असताना रेल नीर (Rail neer) जुलैपर्यंत अनेक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार नाही. मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील (MMR) रेल्वेच्या अंबरनाथ प्लांटमध्ये उत्पादनाच्या कमतरतेमुळे भारतीय रेल्वेकडून विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याचा म्हणजेच रेल नीरचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, पश्चिम रेल्वेवरील (western railway) बोरिवली ते सुरत आणि मध्य रेल्वेवरील (central railway) ठाणे ते कर्जत या स्थानकांवर रेल नीरची विक्री होणार नाही. अंबरनाथ प्लांट चालवणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) नुसार, हे निर्बंध 10 मार्च ते 30 जून पर्यंत लागू राहतील. रेल्वे सूत्रांनी सांगितले की, स्थानकांवरील केटरिंग स्टॉल्सना या टंचाईची माहिती देण्यात आली आहे. तसेच रेल्वे त्यांना खाजगी कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगीही देणार आहे. रेल नीरचे पाणी प्रति बाटली 14 रुपयाला विकले जाते, तर इतर ब्रँड एक रुपया जास्त किमतीत विकतात. आयआरसीटीसीच्या अंबरनाथ प्लांटची उत्पादन क्षमता दररोज 14,500 कार्टन आहे. प्रत्येक कार्टनमध्ये 12 बाटल्या असतात. न्हाळ्याच्या काळात स्थानकांवरील पाण्याची मागणी सामान्यतः पुरवठ्यापेक्षा 4,500 ते 5,000 कार्टन इतकी जास्त असते. आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेंना कळवले आहे आणि त्यांना इतर मान्यताप्राप्त ब्रँडचे बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी दिली आहे.” दरवर्षी उन्हाळ्यात आयआरसीटीसी 10 ते 12 दिवस पुरवठा कमी करते, परंतु इतक्या मोठ्या कालावधीसाठी पुरवठ्याला फटका बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयआरसीटीसीला त्यांच्या अंबरनाथ प्लांटमध्ये रेल नीरच्या दुसऱ्या उत्पादन लाईनसाठी मंजुरी मिळाली आहे. यामुळे उत्पादन दररोज 29,000 बाटल्यांपर्यंत वाढेल. या महिन्यात सुरू होणाऱ्या या प्रकल्पाचे काम पुढील वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्याची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये आहे.हेही वाचा अपघातांप्रकरणी 58 बेस्ट बस चालक बडतर्फ गारगाई धरण प्रकल्प निधीत 270 कोटींची वाढ

रेल्वे प्रशासनाने रेल नीरच्या विक्रीवर आळा घातला

उन्हाळा सुरू झाला असल्याने नागरिकांची तहान वाढली आहे. प्रवासात पाणी खरेदी करण्याचे प्रमाण चांगलेच असताना रेल नीर (Rail neer) जुलैपर्यंत अनेक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार नाही. मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील (MMR) रेल्वेच्या अंबरनाथ प्लांटमध्ये उत्पादनाच्या कमतरतेमुळे भारतीय रेल्वेकडून विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याचा म्हणजेच रेल नीरचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.परिणामी, पश्चिम रेल्वेवरील (western railway) बोरिवली ते सुरत आणि मध्य रेल्वेवरील (central railway) ठाणे ते कर्जत या स्थानकांवर रेल नीरची विक्री होणार नाही. अंबरनाथ प्लांट चालवणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) नुसार, हे निर्बंध 10 मार्च ते 30 जून पर्यंत लागू राहतील.रेल्वे सूत्रांनी सांगितले की, स्थानकांवरील केटरिंग स्टॉल्सना या टंचाईची माहिती देण्यात आली आहे. तसेच रेल्वे त्यांना खाजगी कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगीही देणार आहे. रेल नीरचे पाणी प्रति बाटली 14 रुपयाला विकले जाते, तर इतर ब्रँड एक रुपया जास्त किमतीत विकतात.आयआरसीटीसीच्या अंबरनाथ प्लांटची उत्पादन क्षमता दररोज 14,500 कार्टन आहे. प्रत्येक कार्टनमध्ये 12 बाटल्या असतात. न्हाळ्याच्या काळात स्थानकांवरील पाण्याची मागणी सामान्यतः पुरवठ्यापेक्षा 4,500 ते 5,000 कार्टन इतकी जास्त असते. आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेंना कळवले आहे आणि त्यांना इतर मान्यताप्राप्त ब्रँडचे बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी दिली आहे.”दरवर्षी उन्हाळ्यात आयआरसीटीसी 10 ते 12 दिवस पुरवठा कमी करते, परंतु इतक्या मोठ्या कालावधीसाठी पुरवठ्याला फटका बसण्याची ही पहिलीच वेळ आहे.आयआरसीटीसीला त्यांच्या अंबरनाथ प्लांटमध्ये रेल नीरच्या दुसऱ्या उत्पादन लाईनसाठी मंजुरी मिळाली आहे. यामुळे उत्पादन दररोज 29,000 बाटल्यांपर्यंत वाढेल. या महिन्यात सुरू होणाऱ्या या प्रकल्पाचे काम पुढील वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्याची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये आहे.हेही वाचाअपघातांप्रकरणी 58 बेस्ट बस चालक बडतर्फगारगाई धरण प्रकल्प निधीत 270 कोटींची वाढ

Go to Source