निडगुंदी पीडीओच्या निवासावर छापा
पाऊण कोटीची बेहिशेबी मालमत्ता जप्त
बेळगाव : निडगुंदी, ता. रायबाग येथील पीडीओच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी छापा टाकला. या छाप्यात मोठे घबाड अधिकाऱ्यांच्या हाती लागले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. राज्यातील विविध ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर व कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. निडगुंदी येथील पीडीओ सदाशिव जयाप्पा करगार यांच्या घरावर लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकला. सरकारी नोकरीला लागल्यापासून आजवर सदाशिव यांनी सरकारकडून सुमारे 25 लाख रुपये पगार घेतला आहे. मात्र, 20 लाखाच्या कारमध्ये ते फिरतात. निडगुंदी येथे त्यांनी मोठा बंगला बांधला आहे. कार, दोन मोटारसायकली, 10 तोळे सोन्याचे दागिने, सुमारे 5 लाखांचे गृहोपयोगी साहित्य अशी माया जमविल्याचे उघडकीस आले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत लोकायुक्त अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार सुमारे पाऊण कोटीचे घबाड उघडकीस आले आहे. या अधिकाऱ्याने नोकरी काळात 25 ते 30 लाख रुपये पगारापोटी घेतले आहेत. प्रत्यक्षात मात्र सुमारे पाऊण कोटीची माया त्यांनी कोठून जमविली, याची चौकशी करत येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी निडगुंदी पीडीओच्या निवासावर छापा
निडगुंदी पीडीओच्या निवासावर छापा
पाऊण कोटीची बेहिशेबी मालमत्ता जप्त बेळगाव : निडगुंदी, ता. रायबाग येथील पीडीओच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी छापा टाकला. या छाप्यात मोठे घबाड अधिकाऱ्यांच्या हाती लागले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. राज्यातील विविध ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर व कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. निडगुंदी येथील पीडीओ सदाशिव जयाप्पा करगार यांच्या घरावर लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय यांच्या […]