राहुल निघाला वसीम

► वृत्तसंस्था/ हापूड उत्तर प्रदेशातील हापूड येथील एका तरुणावर मुंबईतील महिलेने बलात्कार करुन धर्म परिवर्तन करायला लावल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने म्हटले आहे या तरुणाशी प्रथम इस्टाग्रामवरुन मैत्री केली. प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर बेशुद्ध करुन बलात्कार केला. त्याला विरोध करताच त्याने विवाहाचे आमिष दाखवले. मात्र आता तो धर्म बदलण्यासाठी दबाव आणत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. […]

राहुल निघाला वसीम

► वृत्तसंस्था/ हापूड
उत्तर प्रदेशातील हापूड येथील एका तरुणावर मुंबईतील महिलेने बलात्कार करुन धर्म परिवर्तन करायला लावल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने म्हटले आहे या तरुणाशी प्रथम इस्टाग्रामवरुन मैत्री केली. प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर बेशुद्ध करुन बलात्कार केला. त्याला विरोध करताच त्याने विवाहाचे आमिष दाखवले. मात्र आता तो धर्म बदलण्यासाठी दबाव आणत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दखल करत तपास सुरु केला. पोलीस तपासात तो उत्तर प्रदेशात हापूड येथे पळून गेला. त्याचा पाठलाग करत ही महिलाही तिकडे गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याने राहुल या नावाने मैत्री केली असली तरी तपासामध्ये त्याचे नाव वसीम मलिक असल्याचे समोर आले आहे. तो माझ्यासह माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणत आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.