राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे महानगरपालिकाच्या निवडणुकीपूर्व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा धक्का बसला आहे. राहुल कलाटे यांनी मंगळवारी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 29 …

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे महानगरपालिकाच्या निवडणुकीपूर्व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा धक्का बसला आहे. 

राहुल कलाटे यांनी मंगळवारी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.  सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे.

ALSO READ: राष्ट्रवादीच्या गटांच्या विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे यांची भूमिका स्पष्ट
सध्या सर्व पक्ष तयारीला लागले आहे. अनेक नेते आपल्या सोयीनुसार, पक्षांतर करत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत राहुल कलाटे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाअध्यक्ष शत्रुध्न काटे उपस्थित होते. 

ALSO READ: मराठवाड्यात नवीन रेल्वे मार्गाची मागणी, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवीन्द्र चव्हाण यांनी म्हटले की, आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप पक्ष पारदर्शक, विकासाभिमुख व लोककल्याणकारी पक्ष आहे.

त्यामुळे समाजाच्या हिताची इच्छा करणाऱ्यांना भाजप पक्षात प्रवेश करण्याची इच्छा आहे. आणि ते प्रवेश करत आहे. 

Edited By – Priya Dixit 

ALSO READ: अजित पवार आणि शरद पवार यांनी हातमिळवणी केली! महाराष्ट्रात मोठा बदल, लवकरच होणार घोषणा

Go to Source