राधानगरी धरणस्थळावर 150 व्या जयंती निमित्त राजर्षींना मुजरा

राधानगरी/प्रतिनिधी राधानगरी धरणस्थळावर छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवून छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख व पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या हस्ते कलशपूजन व पुतळा पूजन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे सदस्य आरती तायशेटे ह्या होत्या. यावेळी बोलताना तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या आरक्षणाचे जनक छ, शाहू […]

राधानगरी धरणस्थळावर 150 व्या जयंती निमित्त राजर्षींना मुजरा

राधानगरी/प्रतिनिधी

राधानगरी धरणस्थळावर छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवून छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख व पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या हस्ते कलशपूजन व पुतळा पूजन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे सदस्य आरती तायशेटे ह्या होत्या.
यावेळी बोलताना तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या आरक्षणाचे जनक छ, शाहू महाराज यांचा वसा व वारसा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असे प्रतिपादन केले, तसेच या स्मारकाजवळ उभारण्यात आलेल्या दाजीपूर विचारे, पिराजीराव घाटगे, छ, राजाराम महाराज, महाराणी लक्ष्मीबाई, अक्कासाहेब महाराज, सर विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ, संदिप भंडारी,वनक्षेत्रपाल सुहास पाटील, अजित माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, राजेंद्र शेटे,उपकार्यकरी अभियंता प्रवीण पारकर, समीर निरुखे, जेनेसीस कॉलेजचे प्राचार्य शोभराज माळवी,विश्वास पाटील,फेजीवडे सरपंच प्रतिभा कासार, उपसरपंच दीपाली पोकम माजी सरपंच फारुख नावळेकर,दादासो सांगावकर,सुरेश पाटील, किरण बोंबाडे, माजी सरपंच बशीर राऊत, मंडळ अधिकारी सुंदर जाधव, यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी,जेनेसीस कॉलेजचे विद्यार्थी,राधानगरी , फेजीवडे ,पडळी येथील ग्रामस्थ व शाहू प्रेमी जनता या जयंती सोहळ्यास सहभागी झाले होते