रोहीत पाटलांची ‘कर्तव्ययात्रा’; पायाला फिंगरी; गावागावात मुक्काम !

विष्णू जमदाडे / मणेराजूरी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तासगांव तालुक्याचे सुपुत्र स्वर्गीय आर. आर आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील कर्तव्य यात्रेसाठी तासगाव -कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघातील गावागावातून पायाला फिंगरी लावून फिरत आहेत. त्यांच्या या यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे . नुकताच मणेराजुरीतही या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या […]

रोहीत पाटलांची ‘कर्तव्ययात्रा’; पायाला फिंगरी; गावागावात मुक्काम !

विष्णू जमदाडे / मणेराजूरी

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तासगांव तालुक्याचे सुपुत्र स्वर्गीय आर. आर आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील कर्तव्य यात्रेसाठी तासगाव -कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघातील गावागावातून पायाला फिंगरी लावून फिरत आहेत. त्यांच्या या यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे .
नुकताच मणेराजुरीतही या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व संस्थांच्या पदाधिकारी व महिलांनी या कर्तव्य यात्रेचे मणेराजुरी बसस्थानक चौकात पारंपारिक वाद्ये लावून जोरदार स्वागत केले. आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी गावातील प्रमुख मार्गावरून सर्व ग्रामस्थांना भेटी देत आशीवार्द घेतले. तसेच वस्ती भागातही अनेक कुटुंबांना भेटी देत विविध प्रश्न जाणून घेतले त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या असणाऱ्या समस्याचे अवलोकन केले व त्या पूर्ण करण्यासाठी शब्द दिला तर काही ग्रामस्थांनी मणेराजूरीच्या शेतीला कायमस्वरूपी मोफत पाणी सोडावे अशी मागणी केली. म्हैशाळ, टेंभू, ताकारी या योजनेतून शेतीला मोफत पाणी सोडून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा अशी मागणी केली . ठिकठिकाणी गावात महिलांनी रोहित पाटील यांचे औक्षण केले.
सध्या रोहीतदादा पाटील हे गावागावात कर्तव्ययात्रा घेवून जात आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे. पण, एक युवक आपल्या गावात येतो, फिरतो, कट्ट्यावर बसलेल्या लोकांशी गप्पा मारतो आणि समस्या ऐकून निराकरण करतो, याचे कौतुक होत आहे. उपस्थितांशी आदरपूर्वक वर्तन करीत असतानाच पुढे काही विरोधी असणाऱ्या प्रबळ दावेदारांचा विरोध कसा पेलणार? असा प्रश्नही गावागावातील ग्रामस्थ करीत आहेत. रोहितदादा आबांच्या पावलावर पाऊल टाकत ‘ते सर्व विरोध कसे परतवायचे याचे प्रशिक्षणच जणू या कर्तव्य यात्रेतून घेत असलेचे दिसत आहे. अनेक शोषित वंचित, शेतकरी, द्राक्ष बागातदार, व्यापारी, या सर्व वर्गातील घटकाशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न रोहितदादा यांच्याकडून होत आहे. त्यांच्या काही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न व त्याचे निराकरण कसे करता येईल याचा अभ्यास करण्याची धोरण सध्या तर रोहित दादा पाटील यांचे हे कर्तव्य यात्रेतून दिसत आहे .
सध्या तासगाव -कवठेमंकाळ तालुक्यासाठी हा हंगाम थोडा अडचणीचाच आहे. द्राक्षाची काढणी सुरू आहे. शेतकरी आणि शेतमजूर सगळेच रानात अडकून पडले आहेत. स्त्री, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलेही गावात कमी आणि शेतात अधिक वावरताना दिसत आहेत. अशा या काळात निवडणूक आली की काय !असा प्रश्न ही यात्रा आलेनंतर पडत आहे. रोहीतदादा पाटील एका गावातून निघून ते पुढच्या गावात जातात, त्या गावात त्यांचा मुक्काम असतो. हा मुक्काम कधी देवळात असतो तर कधी समाज मंदीरात सकाळी उठून पुन्हा दुसरे गाव असे गेली दहा दिवस सुरू आहे . या यात्रेला प्रतिसादही मोठा मिळत आहे .एकूणच भाजपाचे खासदार संजय काका पाटील व प्रभाकर पाटील त्यांचे कुंटूबिय मतदारसंघात सतत दौरे, कार्यक्रम, करुन संपर्क साधत असताना रोहीतदादा पाटील यांनाही कर्तव्य यात्रा काढून आपला राष्ट्रवादीचा गट रिचार्ज केला आहे .
रोहित पाटील यांची कार्यतत्परता हायस्कूल शाळेला चार खोल्यांचा निधी देणेचा दिला शब्द !
एकीकडे रोहित पाटील यांच्या यात्रेचे नाव कर्तव्य यात्रा आहे त्यामुळे रोहितदादा पाटील हे मतदारसंघातील गावागावातील ग्रामस्थांची अनेक कर्तव्य खांद्यावर घेऊन पार पाडत आहेत, त्याचाच प्रत्यय मणेराजूरीकरांना आला ! महावीर चक्र विजेते पांडुरंग साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे सुमारे एक कोटी रुपयांचे बांधकाम लोकवर्गणीतून जोमात सुरू आहे, अनेक देणगीदार व दानशूरांनी यासाठी मोठी मदत केली आहे ;कर्तव्य यात्रेदरम्यान रोहित पाटील यांनी शाळेच्या बांधकामाची पहाणी केली या कामाचे कौतुक करून शाळेसाठी चार खोल्यांचा निधी देणेचा शब्द दिला तर शाळेतील स्कॉलरशिप व शिष्यवृत्तीत चाळीस विद्यार्थी आले तर आणखी एक खोलीचा निधी देण्याचा संकल्प बोलून दाखविला . शाळेचे प्राचार्य सतीश घाडगे व जि.प .सदस्य सतीश पवार यांनी रोहित दादांच्या या संकल्पलाचे स्वागत केले .