सिव्हील हॉस्पिटल समोरची अनधिकृत खोक्यांची रांग हटवण्यास सुरवात

सांगली / प्रतिनिधी यापूर्वी अधिकृत आणि अनधिकृत खोक्यांचे पुनर्वसन केल्यानंतर सुद्धा बसवण्यात आलेली चांगली सिव्हिल हॉस्पिटल शेजारची खोक्यांची रांग सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली आहे. शहर, चौक, रस्ते सुशोभीकरण, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारिकरण, अतिक्रमण मुक्त फुटपाथसाठी बेकायदेशीर खोकी हटवण्याची पालिकेने मोहीम हाती घेतलेली आहे. सोमवारी सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये […]

सिव्हील हॉस्पिटल समोरची अनधिकृत खोक्यांची रांग हटवण्यास सुरवात

सांगली / प्रतिनिधी

यापूर्वी अधिकृत आणि अनधिकृत खोक्यांचे पुनर्वसन केल्यानंतर सुद्धा बसवण्यात आलेली चांगली सिव्हिल हॉस्पिटल शेजारची खोक्यांची रांग सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली आहे. शहर, चौक, रस्ते सुशोभीकरण, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारिकरण, अतिक्रमण मुक्त फुटपाथसाठी बेकायदेशीर खोकी हटवण्याची पालिकेने मोहीम हाती घेतलेली आहे.
सोमवारी सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये ६ खोकी काढण्यात आली . पुढील कारवाई अद्याप चालू आहे. उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण टीम यांनी सदरची कामगिरी केली आहे . अनेक वर्षांपासून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्या बाबत वारंवार नागरिकांकडून मागणी होत होती. शुक्रवारपासून कारवाई चालू केली आहे. उप आयुक्त वैभव साबळे, पंडित पाटील यांनी बेकायदेशीर खोकी काढून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊनही ती हटविलेली नव्हती , यापुढे मिरज आणि कुपवाड अशा तिन्ही शहरात कारवाई होणार आहे,