आबा-हिंद स्पोर्ट्सतर्फे पीव्हीआर आंतरराज्य भव्य जलतरण स्पर्धा
बेळगाव : येथील नामांकित आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त आश्रयाखाली निमंत्रितांच्या पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य भव्य जलतरण स्पर्धा दिनांक 3 व 4 फेब्रुवारी रोजी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आयोजित करण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. या बैठकीत शुभांगी मंगळूरकर, शितल हुलबत्ते, अॅड. संतोष गडकरी, विश्वास पवार आदी उपस्थित होते. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथील जलतरणपटू भाग घेणार असून विजेत्या जलतरणपटूंना प्रशस्तीपत्र पदके, चषक देऊन गौरविण्यात येणार आहे, असे आबा क्लबचे एन आय एस जलतरण प्रशिक्षक व स्पर्धा प्रमुख विश्वास पवार यांनी कळविले आहे. या स्पर्धा शनिवार दिनांक 3 रोजी सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार असून स्पर्धकांनी ठीक साडेनऊ वाजता गोवावेस जलतरण तलावावर उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे.
Home महत्वाची बातमी आबा-हिंद स्पोर्ट्सतर्फे पीव्हीआर आंतरराज्य भव्य जलतरण स्पर्धा
आबा-हिंद स्पोर्ट्सतर्फे पीव्हीआर आंतरराज्य भव्य जलतरण स्पर्धा
बेळगाव : येथील नामांकित आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त आश्रयाखाली निमंत्रितांच्या पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य भव्य जलतरण स्पर्धा दिनांक 3 व 4 फेब्रुवारी रोजी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आयोजित करण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. या बैठकीत शुभांगी मंगळूरकर, शितल हुलबत्ते, अॅड. संतोष गडकरी, विश्वास पवार आदी उपस्थित होते. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र […]