नेव्हलनींच्या मृत्यूस पुतीन जबाबदार !

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नेव्हलनी यांच्या कारागृहात झालेल्या अचानक मृत्यूची जबाबदारी पुतीन यांची आहे, असा स्पष्ट आरोप अमेरिकेचे अध्यक्ष जोसेन बायडेन यांनी केला आहे. गेल्या बुधवारी नेव्हलनी यांचा मृत्यू झाला होता. देशद्रोहाच्या आरोपात त्यांना 19 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. बुधवारी सकाळी फिरुन आल्यानंतर अचानक ते […]

नेव्हलनींच्या मृत्यूस पुतीन जबाबदार !

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी 
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नेव्हलनी यांच्या कारागृहात झालेल्या अचानक मृत्यूची जबाबदारी पुतीन यांची आहे, असा स्पष्ट आरोप अमेरिकेचे अध्यक्ष जोसेन बायडेन यांनी केला आहे. गेल्या बुधवारी नेव्हलनी यांचा मृत्यू झाला होता. देशद्रोहाच्या आरोपात त्यांना 19 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. बुधवारी सकाळी फिरुन आल्यानंतर अचानक ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.
आता जगभरातून या मृत्यूवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. बायडेन यांनी शनिवारी प्रथमच या मृत्यूवर भाष्य केले. रशियात कशा प्रकारची राजवट आहे, याचे प्रत्यंतर या घटनेवरुन येते अशी टिप्पणी बायडेन यांनी केली.
चीनचे मौन
नेव्हलनी यांच्या मृत्यूवर चीनने मात्र अद्याप मौन पाळले आहे. अलिकडच्या काळात रशिया आणि चीन यांच्यात सख्य वाढले आहे. अमेरिकेचा विरोध हे या जवळकीचे कारण असल्याची चर्चा आहे. नेव्हलनी यांच्या पत्नीनेही आपल्या पतीचा मृत्यू पुतीन यांच्यामुळेच घडल्याचा आरोप केला असून पुतीन यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी केलेला आहे.