पूर्वा बर्वेला बॅडमिंटनचे जेतेपद

वृत्तसंस्था/ जयपूर स्लोव्हाकियामध्ये रविवारी झालेल्या स्लोव्हेक खुल्या फ्युचर आंतरराष्ट्रीय सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू पूर्वा बर्वेने एकेरीचे जेतेपद पटकाविले. विश्व बॅडमिंटन फेडरेशन आणि स्लोव्हेक बॅडमिंटन फेडरेशन यांच्या संयुक्त यजमानपदाने ही स्पर्धा 5 दिवस चालली होती. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पूर्वा बर्वेने हंगेरीच्या टॉपसिडेड अॅग्नेस कोरोसीचा 22-20, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये 35 मिनिटांच्या कालावधीत पराभव […]

पूर्वा बर्वेला बॅडमिंटनचे जेतेपद

वृत्तसंस्था/ जयपूर
स्लोव्हाकियामध्ये रविवारी झालेल्या स्लोव्हेक खुल्या फ्युचर आंतरराष्ट्रीय सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू पूर्वा बर्वेने एकेरीचे जेतेपद पटकाविले.
विश्व बॅडमिंटन फेडरेशन आणि स्लोव्हेक बॅडमिंटन फेडरेशन यांच्या संयुक्त यजमानपदाने ही स्पर्धा 5 दिवस चालली होती. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पूर्वा बर्वेने हंगेरीच्या टॉपसिडेड अॅग्नेस कोरोसीचा 22-20, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये 35 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. पुण्याच्या पूर्वा बर्वेने या स्पर्धेत आपल्या शानदार अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन घडविले. या स्पर्धेत पूर्वाने उपांत्यफेरीत स्वीडनच्या युरेलचा 21-14, 21-14 तसेच दुसऱ्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या मिरांडा विल्सनचा 21-5, 21-10 असा पराभव केला होता. पूर्वा बर्वेला निखील कानेटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.