अवैध खाणींप्रकरणी पंजाब सरकार अडचणीत
सिद्धू यांच्या याचिकेवर एनजीटीकडून नोटीस
वृत्तसंस्था/ चंदीगड
राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पंजाब सरकारला नोटीस जारी केली आहे. काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासमवेत इतर जणांकडून रुपनगरमधील अवैध वाळू उपसा रोखण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे.
रामनगर समवेत रोपडमध्येही देखील अवैध खाणकामाप्रकरणी न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले होते. तसेच न्यायालयाने पुढी सुनावणीवेळी मागील 10 वर्षांमध्ये अवैध खाणकामप्रकरणी नोंद सर्व प्रकरणांचा तपशील सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. तसेच एनजीटीने देखील याप्रकरणी राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे.
Home महत्वाची बातमी अवैध खाणींप्रकरणी पंजाब सरकार अडचणीत
अवैध खाणींप्रकरणी पंजाब सरकार अडचणीत
सिद्धू यांच्या याचिकेवर एनजीटीकडून नोटीस वृत्तसंस्था/ चंदीगड राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पंजाब सरकारला नोटीस जारी केली आहे. काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासमवेत इतर जणांकडून रुपनगरमधील अवैध वाळू उपसा रोखण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे. रामनगर समवेत रोपडमध्येही देखील अवैध खाणकामाप्रकरणी […]
