पुणेरी पलटन अंतिम फेरीत

वृत्तसंस्था /हैद्राबाद 2024 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटन संघाने पाटना पायरेट्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा पुणेरी पलटन हा या मोसमातील पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात पुणेरी पलटनने पाटना पायरेट्सचा 37-21 अशा 16 गुणांच्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पुणेरी पलटनचा कर्णधार अस्लम इनामदारने चढायांवर […]

पुणेरी पलटन अंतिम फेरीत

वृत्तसंस्था /हैद्राबाद
2024 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटन संघाने पाटना पायरेट्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा पुणेरी पलटन हा या मोसमातील पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात पुणेरी पलटनने पाटना पायरेट्सचा 37-21 अशा 16 गुणांच्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पुणेरी पलटनचा कर्णधार अस्लम इनामदारने चढायांवर 7 गुण मिळविले. पाटना पायरेट्सने यापूर्वी तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. पाटना पायरेट्सतर्फे सचिनने आपल्या काही चढायांवर गुण वसूल केले होते. पण त्याला त्याच्या साथिदाराकडून चांगली साथ मिळाली नाही. दरम्यान पुणेरी पलटनने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळविला. सामन्याच्या पूर्वार्धात मोहित गोयतने 6 व्या मिनिटाला पुणेरी पलटनला आघाडीवर नेले. यावेळी पाटना पायरेट्सचे सर्व गडी बाद झाले होते. मध्यंतरावेळी पुणेरी पलटनने पाटना पायरेट्सवर 20-11 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पुणेरी पलटनने दुसऱ्यांदा पाटना पायरेट्सचे सर्व गडी बाद केले. अखेर पाटना पायरेट्सचे आव्हान पुणेरी पलटनने संपुष्टात आणले. उपांत्य फेरीतील पुणेरी पलटनचा हा मोठा विजय आहे.