पुणे : इंद्रायणी नदीत उडी मारणाऱ्या महिला पोलिसाचा मृतदेह सापडला

पुण्यातील आळंदी मध्ये इंद्रायणीच्या नदीपात्रात उडी घेत आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला आहे.

पुणे : इंद्रायणी नदीत उडी मारणाऱ्या महिला पोलिसाचा मृतदेह सापडला

पुण्यातील आळंदी मध्ये इंद्रायणीच्या नदीपात्रात उडी घेत आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला आहे. या महिला पोलिसाने रविवारी संध्याकाळी 5:15 वाजेच्या सुमारास पाण्यात उडी घेतली. त्यांनतर वेगवेगळ्या शोध पथकाने तिचा शोध घेतला अखेर महिला पोलिसाचा मृतदेह तीन दिवसांनंतर गोलेगाव येथे आढळला.अनुष्का केदार असे या मयत महिला पोलीसचे नाव आहे.अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या आणि सध्या पुणे ग्रामीण मुख्यालयात नेमणुकीला होत्या.

त्यांनी रविवारी इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून पाण्यात उडी घेत आपले आयुष्य संपविले. घटनेची माहिती मिळाल्यावर आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमनदलाला देखील बोलावले. अंधार झाल्यामुळे महिला पोलिसांना शोधण्याचे काम थांबविले. सोमवारी आणि मंगळवारी शोध मोहीम सुरु करण्यात आली. 

महिला पोलिसाचा शोध आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ पथकाने केला. अखेर आज बुधवारी महिला पोलिसाचा मृतदेह गोलेगाव येथे आढळला. 

Edited by – Priya Dixit   

 

Go to Source