पुण्याचे गोल्डन मॅन सनी वाघचौरेला लॉरेन्स बिश्नोईची धमकी

पुण्याचे गोल्डन मॅन सनी वाघचौरेला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून 5 कोटींच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. ही रक्कम 5 दिवसांत मिळाली नसल्यास सनी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात सनी वाघचौरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात …

पुण्याचे गोल्डन मॅन सनी वाघचौरेला लॉरेन्स बिश्नोईची धमकी

पुण्याचे गोल्डन मॅन सनी वाघचौरेला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून 5 कोटींच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. ही रक्कम 5 दिवसांत मिळाली नसल्यास सनी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात सनी वाघचौरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाकडून तपास सुरु केला आहे. 

ALSO READ: पुण्यात दुर्दैवी अपघात: ५ वर्षांच्या मुलाला कारने ओढले; हृदयद्रावक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद

मिळालेल्या माहितीनुसार, 25 जानेवारी रोजी सनी वाघचौरे यांच्या मोबाईलवर कॅनडातील  एका क्रमांकावरून व्हॉट्सअप वर कॉल आला. सनी ने कॉल घेतल्यावर मी बिष्णोई गॅंग मधून शुभम लोणकर बोलत आहे. तू कोणालाही विचार किंवा गुगलवर सर्च कर की बिष्णोई गॅंग कोण आहे. बाकी मी तुझ्याशी मेसेजवर बोलतो असे म्हणून फोन कट झाला.  तुझ्याकडून 5 कोटी पाहिजे तू कुठेही पळून गेलास तरीही गोळी तुझ्यापर्यंत कुठूनही येऊ शकते. जगातली कोणतीही ताकद तुला वाचवू शकणार नाही. तुझ्या कडे 5 दिवसांचा वेळ आहे. तयार राहा. जितकं सोनं तू घालून फिरतोस त्यापेक्षा जास्त पितळ तुझ्यात भरू. लक्षात ठेव. आरजू बिष्णोई.

ALSO READ: पुणे: न्यायालयीन कोठडीतील कैदी रुग्णालयातून पळून गेला
हा मेसेज सनीला आल्यावर त्याने तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसंयुक्तालयाकडे तक्रार केली. 

तक्राराची दखल घेत पिंपरी चिंचवड पोलीस गुंड विरोधी पथकाने तपास सुरु केले. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 

  Edited By – Priya Dixit

ALSO READ: १९ फेब्रुवारी रोजी पुण्यात दारू मिळणार नाही! शिवजयंतीसंदर्भात महानगरपालिकेचा मोठा निर्णय

Go to Source