पुणे पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांकडून अटक

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे.अपघातात दोन अभियंत्यांच्या मृत्यूनंतर देशभरात यावरून संताप व्यक्त करण्यात आला होता.आरोपीनं रक्त तपासणीसाठी दिलेले नमुने बदलून त्याऐवजी त्याच्या आईच्या रक्ताच्या …

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांकडून अटक

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे.

 

अपघातात दोन अभियंत्यांच्या मृत्यूनंतर देशभरात यावरून संताप व्यक्त करण्यात आला होता.

 

आरोपीनं रक्त तपासणीसाठी दिलेले नमुने बदलून त्याऐवजी त्याच्या आईच्या रक्ताच्या नमुने पाठवण्यात आले होते, अशी माहिती पुणे पोलिसांनी शनिवारी दिली.

 

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसंच पोलिसांनी स्थानिक न्यायालयालाही दोन दिवसांपूर्वी याबाबत माहिती दिली होती.

 

अपघातानंतरच्या प्राथमिक तपासात आरोपीच्या वैद्यकीय अहवालात त्यानं दारु प्यायली नमसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, बारच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन आरोपी दारू पित असल्याचं दिसून आलं.

 

या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीचे वडील आणि आजोबांनाही अटक केली आहे. तसंच बनावट वैद्यकीय अहवाल तयार करणाऱ्या दोन डॉक्टरांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

 

अपघातानंतर बाल न्याय मंडळानं रस्ते सुरक्षा या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देत आरोपीला सोडलं होतं.

Published By- Dhanashri Naik 

 

Go to Source