पुणे महापालिकाच्या निवडणुकीत भाजप रिपब्लिकन युती, आरपीआयला 9 जागा
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि रामदास आठवले यांचे पक्ष आरपीआयची युती झाली असून युतीत आरपीआयला एकूण 9 जागा दिल्या आहेत.अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे आणि प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली आहे.
ALSO READ: शिवसेना युबीटीने काँग्रेसशी हातमिळवणी केली, जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर
यासंदर्भात बोलताना आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भाजपकडे सुरुवातीला 15 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र वाटाघाटीअंती भाजपकडून आरपीआयला 9 जागा देण्यात आल्या आहेत. या 9 उमेदवारांमध्ये 6 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
आरपीआयच्या उमेदवारांमध्ये 5 बौद्ध समाजातील, 3 मातंग समाजातील आणि 1 धनगर समाजातील उमेदवारांचा समावेश आहे.
ALSO READ: विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला
पुणे महापालिका निवडणूक भाजप–आरपीआय युती म्हणून एकत्रितपणे लढवली जाणार असून, या निवडणुकीत पुणे महापालिकेवर भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची सत्ता येईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
ALSO READ: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश
यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप तसेच महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By – Priya Dixit
