Chaitra Navratri Special Recipe स्वादिष्ट भोपळ्याची भाजी

साहित्य- ५०० ग्रॅम -भोपळा दोन -हिरव्या मिरच्या मेथी दाणे एक -इंच आले दोन चमचे -तूप अर्धा चमचा -हळद एक चमचा -धणेपूड

Chaitra Navratri Special Recipe स्वादिष्ट भोपळ्याची भाजी

साहित्य-
५०० ग्रॅम -भोपळा
दोन -हिरव्या मिरच्या
मेथी दाणे
एक -इंच आले
दोन चमचे -तूप  
अर्धा चमचा -हळद
एक चमचा -धणेपूड
अर्धा चमचा -बडीशेप पावडर
चिमूटभर हिंग
एक चमचा -जिरे
अर्धा चमचा -गरम मसाला
एक -चमचा गूळ
मीठ
कढीपत्ता
कोथिंबीर

ALSO READ: Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड
कृती-
सर्वात आधी भोपळा स्वच्छ धुवा आणि सोलून घ्या आणि नंतर त्याचे लहान तुकडे करा. आता पॅनमध्ये देशी तूप घाला. आता तुपात हिंग आणि जिरे घाला. आता किसलेले आले आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. तुम्हाला तिखट आवडत असल्यास तुम्ही मिरची ऐवजी तिखटाचा वापर करू शकतात. आता यामध्ये मेथी दाणे आणि कढीपत्ता घाला. तसेच पॅनमध्ये हळद, धणेपूड, बडीशेप पावडर आणि मीठ घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा. यानंतर, भोपळ्याचे तुकडे या मसाल्यांमध्ये चांगले मिसळा. आता भाजी झाकून ठेवावी लागेल आणि मंद आचेवर दाह मिनिटे शिजू द्यावे. भोपळा मऊ झाल्यावर तुम्ही ही भाजी हलकेच मॅश करू शकता. भाजीत गोडवा आणण्यासाठी त्यात गूळ घालावा. आता भाजीत गरम मसाला घाला आणि भोपळ्याची भाजी दोन मिनिटे शिजवा. गॅस बंद केल्यानंतर त्यावर कोथिंबीर गार्निश करावी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: रामनवमी विशेष रेसिपी Apple Coconut Barfi
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: Summer Special Instant Recipe खरबूजाचे शिकरण