भुयारी मार्गातील मनपाकडून पाणी उपसा

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भुयारी मार्गात साठलेले पाणी महानगरपालिकेकडून उपसा करण्यात आला. या भुयारी मार्गाचा अपेक्षेनुसार उपयोग केला जात नसला तरी पाण्याचा धोका असल्याने पाणी उपसा करण्यात आला. कोर्ट आवारामध्ये ये-जा करण्यासाठी सव्वा कोटी रुपये खर्च करून हा भुयारी मार्ग निर्माण करण्यात आला आहे. रस्त्यावरून होणारी वाहतूक कोंडी व धोका लक्षात घेत हा भुयारी मार्ग […]

भुयारी मार्गातील मनपाकडून पाणी उपसा

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भुयारी मार्गात साठलेले पाणी महानगरपालिकेकडून उपसा करण्यात आला. या भुयारी मार्गाचा अपेक्षेनुसार उपयोग केला जात नसला तरी पाण्याचा धोका असल्याने पाणी उपसा करण्यात आला. कोर्ट आवारामध्ये ये-जा करण्यासाठी सव्वा कोटी रुपये खर्च करून हा भुयारी मार्ग निर्माण करण्यात आला आहे. रस्त्यावरून होणारी वाहतूक कोंडी व धोका लक्षात घेत हा भुयारी मार्ग निर्माण करण्यात आला असला तरी याचा अपेक्षनुसार उपयोग केला जात नाही. त्यामुळे भुयारी मार्ग पडूनच आहे. यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाकडून येथील पाण्याचा उपसा करण्यात आला.