खानापूर तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणास सुरुवात

पुढील तीन दिवसात 19,340 बालकांना डोस दिले जाणार खानापूर : तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणास रविवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस देवून सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेश किडसन्नावर यांनी उपस्थितांचे स्वागत करून पल्स पोलिओच्या लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. तालुक्यात मंगळवारपर्यंत 19 हजार 340 बालकांना डोस दिले जाणार आहेत. शून्य […]

खानापूर तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणास सुरुवात

पुढील तीन दिवसात 19,340 बालकांना डोस दिले जाणार
खानापूर : तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणास रविवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस देवून सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेश किडसन्नावर यांनी उपस्थितांचे स्वागत करून पल्स पोलिओच्या लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. तालुक्यात मंगळवारपर्यंत 19 हजार 340 बालकांना डोस दिले जाणार आहेत. शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. घरोघरी जावून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील एकही बालक या लसीकरणापासून चुकणार नाही, याची खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पल्स पोलिओ लसीकरणासाठी 164 केंद्रे तयार करण्यात आली असून दहा फिरती पथके तर 642 कर्मचाऱ्यांच्या सहभागाने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील बेकवाड आणि करंबळसह पाच गावची लक्ष्मी यात्रा सुरू आहे. यासाठी परराज्यातून आणि बाहेरुन आलेल्या बालकांनाही या तीन दिवसात पल्स पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. यासाठी यात्रा असलेल्या गावात वेगळी पथके तयार करून घरोघरी जावून बालकांना डोस दिले जाणार आहे. तालुक्यात एकूण 19,340 बालके असून शहरात 1 हजार 268 बालके आहेत. तर ग्रामीण भागात 18 हजार 72 बालके आहेत. प्रत्येकाला लस देण्याचे नियोजन सुरू असून  मोहिमेला सुरुवात केलेली आहे.