नंदगडमध्ये संगोळ्ळी रायण्णा उत्सवाला जनतेकडून प्रतिसाद
रायण्णांचा पुतळ्याला अभिवादन, मनोरंजनात्मक कार्यक्रम : विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
वार्ताहर /नंदगड
नंदगड ता. खानापूर येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी पूजा करून व ज्योत पेटवून रायण्णा उत्सवाची थाटात सुरुवात करण्यात आली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ढोल वाजवून यात्रोत्सवाला सुरुवात झाल्याचे घोषित केले. यावेळी नंदगड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, उपाध्यक्षा संगीता म•ाrमणी, ग्रा. पं. सदस्य तसेच प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. कार्यकारी अधिकारी विरणगौडा एगनगौडर, महसूल अधिकारी शशिकांत टक्केकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर सोनोळी आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते. संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी ज्योत पेटविण्यात आली. समाधीस्थळापासून रायण्णा यांच्या पुतळ्dयापर्यंत वाजतगाजत ज्योत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आमदार हलगेकर व प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी रायण्णांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर आलेल्या जनतेने संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या सैन्यातील एक विश्वासू सेनापती होते. राणी चन्नम्मा यांच्या सैन्यात असताना व राणीच्या मृत्यूनंतरही संगोळ्ळी रायण्णा यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सातत्याने मोठा लढा दिला. आपले सैन्य बांधण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न लाखमोलाचे होते. अशा या देशभक्तांचे कार्य अजरामर आहे. रायण्णांच्या नावे नंदगड गावचा, आनंदगड किल्ला व विविध ठिकाणचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी आपण एक आमदार या नात्याने प्रयत्न करणार आहे.
इतिहासाची आठवण
सामाजिक कार्यकर्ते शंकर सोनोळी म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून नंदगड येथे संगोळ्ळी रायण्णा उत्सव व्हावा म्हणून मागणी करण्यात येत होती. अनेकांच्या प्रयत्नाने गत वर्षापासून कर्नाटक सरकार व बेळगाव जिल्हा प्रशासनाने नंदगड गावात संगोळ्ळी रायण्णा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार यावर्षी येथे हा उत्सव साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राणी कित्तूर चन्नम्मा व क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा संबंध असलेला नंदगड गावच्या पश्चिमेला असलेला आनंदगड किल्ला आहे. या किल्ल्याला इतिहासाचा वारसा असल्याने नंदगड गावापासून किल्ल्यापर्यंत जाणारा रस्ता करावा. जेणेकरून अनेक लोक या किल्ल्याला भेट देतील आणि इतिहासाची आठवण राहील. खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या कल्याण मंडपात दुपारी 4 वा. नंदगड गावातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यानंतर बाहेरून आलेल्या कला संघाकडून मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे झाले.
Home महत्वाची बातमी नंदगडमध्ये संगोळ्ळी रायण्णा उत्सवाला जनतेकडून प्रतिसाद
नंदगडमध्ये संगोळ्ळी रायण्णा उत्सवाला जनतेकडून प्रतिसाद
रायण्णांचा पुतळ्याला अभिवादन, मनोरंजनात्मक कार्यक्रम : विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण वार्ताहर /नंदगड नंदगड ता. खानापूर येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी पूजा करून व ज्योत पेटवून रायण्णा उत्सवाची थाटात सुरुवात करण्यात आली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ढोल वाजवून यात्रोत्सवाला सुरुवात झाल्याचे घोषित केले. यावेळी नंदगड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, उपाध्यक्षा संगीता म•ाrमणी, ग्रा. पं. […]