19 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
१९ फेब्रुवारी २०२६ गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) निमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ALSO READ: महाराष्ट्रात टिपू सुलतानच्या नावावर असलेले चौक खपवून घेतले जाणार नाहीत- नितेश राणे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, या दिवशी राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद राहतील. अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: अजित पवारांच्या पायलटने जाणूनबुजून त्यांचे विमान कोसळवले, रोहित पवारने केला खळबळजनक दावा
तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कॅलेंडरनुसार, १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सर्व खाजगी आणि सरकारी बँकांना सुट्टी असेल. तथापि, ऑनलाइन बँकिंग, ATM आणि UPI सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजन्मोत्सवाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि सोहळे आयोजित केले जातात.
त्यामुळे, जर तुमचे काही बँकेचे किंवा सरकारी कार्यालयाचे काम असेल, तर ते या सुट्टीचा विचार करून आधीच नियोजित करणे सोयीचे ठरेल.
ALSO READ: लोणावळा जवळील लोटस पॉइंट धबधब्यात अभियांत्रिकीचा विद्यार्थी बुडून मृत्यू
Edited By- Dhanashri Naik
