Pu La Deshpande Birthday :पु. ल. देशपांडे ह्यांची कविता मी एकदा आळीत गेलो

मी एकदा आळीत गेलो चाळ घेऊन बाहेर आलो तोंडात भरली सगळी चाळ मी तर मुलखाचा वाचाळ ! कधी पायात बांधतो चाळ उगीच नाचतो सोडून ताळ

Pu La Deshpande Birthday :पु. ल. देशपांडे ह्यांची कविता मी एकदा आळीत गेलो

मी एकदा आळीत गेलो

चाळ घेऊन बाहेर आलो

तोंडात भरली सगळी चाळ

मी तर मुलखाचा वाचाळ !

कधी पायात बांधतो चाळ

उगीच नाचतो सोडून ताळ

वजन भारी होते गाळणं

पायाचीही होते चाळण !

गाळणी घेऊन गाळतो घाम

चाळणी घेऊन चाळतो दाम

चाळी बाहेर दुकान माझे

विकतो तेथे हंसणे ताजे !

‘ खुदकन ‘ हसूचे पैसे आठ

‘ खो-खो-खो ‘ चे एकशे साठ

हसवणुकीचा करतो धंदा

कुणी निंदा, कुणी निंदा-कुणी वंदा !

कुणा कुणाला पडतो पेच

ह्याला का नाही लागत ठेच

हा लेकाचा शहाणा की खुळा

मग मी मारतो मलाच डोळा !!

 

पु. ल. देशपांडे