कणबर्गी निवासी योजनेसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद
बुडाच्या अंदाजपत्रक बैठकीत निधी राखीव
बेळगाव : बेळगाव नगरविकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 सालाच्या 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला शुक्रवारी झालेल्या बैठकीत अनुमोदन देण्यात आले. कणबर्गी योजनेसाठी 50 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, बुडा आयुक्त शकील अहमद यांच्यासह इतर सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पाला अनुमोदन देण्यात आले. नव्या निवासी योजनेसाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असून रस्ते व चौकांच्या विकासासाठी 50 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. व्यापारी संकुलासाठी 35 कोटी रुपये, विविध उद्यानांच्या विकासासाठी 15 कोटी रुपये, तलावांच्या विकासासाठी 15 कोटी रुपये व तलावाभोवती कुंपण घालण्याच्या योजनेसाठी 5 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अर्थसंकल्पात 50 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले असून फिरत्या कॅमेऱ्यांसाठी 50 लाख रुपये, शहर सौंदर्यीकरणासाठी 5 कोटी रुपये व कणबर्गी येथील निवासी योजना क्र. 61 साठी 50 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
Home महत्वाची बातमी कणबर्गी निवासी योजनेसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद
कणबर्गी निवासी योजनेसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद
बुडाच्या अंदाजपत्रक बैठकीत निधी राखीव बेळगाव : बेळगाव नगरविकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 सालाच्या 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला शुक्रवारी झालेल्या बैठकीत अनुमोदन देण्यात आले. कणबर्गी योजनेसाठी 50 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, बुडा आयुक्त शकील अहमद यांच्यासह इतर सदस्यांच्या […]