पुणे- हडपसर येथील दगडफेक घटनेच्या निषेधार्थ तावडे हॉटेल चौकात  हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने रास्ता रोको

उचगाव/वार्ताहरपु पुणे हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर १२ जून रोजी एका समाजकंटकाने दगड भिरकावला. त्यामुळे सर्व शिवभक्त तसेच समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो शिवप्रेमीं व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तावडे हॉटेल चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.सुमारे पाऊण तास आंदोलन चालले.यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. […]

पुणे- हडपसर येथील दगडफेक घटनेच्या निषेधार्थ तावडे हॉटेल चौकात  हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने रास्ता रोको

उचगाव/वार्ताहरपु
पुणे हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर १२ जून रोजी एका समाजकंटकाने दगड भिरकावला. त्यामुळे सर्व शिवभक्त तसेच समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो शिवप्रेमीं व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तावडे हॉटेल चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.सुमारे पाऊण तास आंदोलन चालले.यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

तावडे हॉटेल चौक कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज कोल्हापूर व हिंदुत्ववादी संघटना यांच्यावतीने दीपक देसाई हिंदू एकता आंदोलन ग्रामीण जिल्हाध्यक्ष व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हडपसर पुणे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक घटनेच्या निषेधार्थ व सतत एक ठराविक समाज ठरवून, पूर्वतयारी ने फक्त हिंदू प्रतिकांचा आणि राष्ट्रपुरुषांचा व राष्ट्रप्रतिकांचा अपमान पुण्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारने ‘राष्ट्रपुरुष व राष्ट्रपिता यांचा अपमान करून सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणारा गुन्हेगारांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देणारा’ कायदा पारित करावा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. महापुरुषांची विटंबना करणार्‍या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी,
पाकिस्तान मुर्दाबाद, जय श्रीराम , भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला.
काही वाहनधारक आपले वाहन बाजूने काढून जात असताना आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत महामार्गावर पळत जात असताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
यावेळी या कृत्याच्या मागे आणखी कोण आहे का ? याचे सखोल अन्वेषण करावे, अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.
कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शाहूपुरी पोलीस ठाणे , गांधीनगर पोलीस ठाणे, शिरोली पोलीस ठाणे, व महामार्ग पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी सत्यजित उर्फ नाना कदम, दिपक देसाई,कुंदन पाटील-विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष, आशिष लोखंडे- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शहराध्यक्ष, गजानन तोडकर- हिंदू एकता आंदोलन तसेच हिंदू संघटना संग्राम निकम मनोहर सोरप, राजकुमार तोडकर, अनेक पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवप्रेमी, हिंदुत्ववादी संघटनेचे समर्थक उपस्थित होते.