वास्को, मुरगावात भाजपतर्फे आणीबाणीचा निषेध

वास्को : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने देशात आणीबाणी लादल्याच्या निषेधार्थ वास्को व मुरगावात काळा दिवस पाळण्यात आला. आणीबाणी हा आपल्या देशाच्या इतिहासातील काळा काळ होता. आपल्या देशाला लोकतंत्र बहाल करण्यासाठी लढलेल्या महान योद्ध्यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, गोवा प्रदेश भाजपाचे सरचिटणीस दामू नाईक, दक्षिण गोवा उपाध्यक्ष जयंत जाधव, मुरगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, वास्को भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य प्रसाद प्रभुगावकर, प्रभारी संतोष केरकर, सरचिटणीस अविनाश नाईक, शांताराम पराडकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वास्कोत भाजप युवा मोर्चातर्फे […]

वास्को, मुरगावात भाजपतर्फे आणीबाणीचा निषेध

वास्को : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने देशात आणीबाणी लादल्याच्या निषेधार्थ वास्को व मुरगावात काळा दिवस पाळण्यात आला. आणीबाणी हा आपल्या देशाच्या इतिहासातील काळा काळ होता. आपल्या देशाला लोकतंत्र बहाल करण्यासाठी लढलेल्या महान योद्ध्यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, गोवा प्रदेश भाजपाचे सरचिटणीस दामू नाईक, दक्षिण गोवा उपाध्यक्ष जयंत जाधव, मुरगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, वास्को भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य प्रसाद प्रभुगावकर, प्रभारी संतोष केरकर, सरचिटणीस अविनाश नाईक, शांताराम पराडकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वास्कोत भाजप युवा मोर्चातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वास्कोत आणीबाणी लागू केल्याच्या निषेधार्थ काळा दिवस पाळताना वक्त्यांनी तत्कालीन नेत्यांवर टीका केली व आणीबाणीच्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी भाजपचे सरचिटणीस दामु नाईक, भाजप दक्षिण गोवा उपाध्यक्ष जयंत जाधव, भाजप वास्को मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, नगरसेविका शमी साळकर, श्रद्धा महाले, नगरसेवक अमेय चोपडेकर, नारायण बोरकर, यतीन कामुर्लेकर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. वास्को भाजप कार्यालय ते हुतात्मा स्मारकापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला.