हिंडलगा चेकपोस्ट नाक्यावर आंदोलन
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कार्यकर्ते एकवटले
वार्ताहर /उचगाव
कर्नाटक राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ तालुका भाजपा मंडळातर्फे दि. 20 जून रोजी सकाळी हिंडलगा फॉरेस्ट चेकपोस्ट नाक्मयावर भाजपा कार्यकर्ते व नेते मंडळींनी आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी हिंडलगा फॉरेस्ट चेकपोस्ट नाक्मयापासून सुळगा पेट्रोल पंपापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना थांबावे लागले. काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांनी पाच गॅरंटी योजना सुरू करून एका बाजूला जनतेला खुष करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. सरकारने तातडीने पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी असा इशारा तालुका भाजपाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिला.
यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर म्हणाले, कर्नाटक सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ त्वरित मागे घ्यावी आणि सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दरवाढ मागे घेईपर्यंत आम्ही आंदोलन तीव्र करू. हिंडलगा ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव म्हणाले, कर्नाटक सरकार टॅक्स जमा करतो. परंतु विकास शून्य आहे. मग हा पैसा जातो कुठे? पेट्रोल डिझेल दरवाढ करून मिळणारा पैसा गॅरंटी योजनेत घालण्याचा त्यांचा मनसुबा आम्ही खपवून घेणार नाही. या आंदोलकासमोर अजित हलकर्णी, विलास ताशीलदार, पंकज घाडी, हिंडलगा ग्रामपंचायतच्या माजी उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, सुरेश नागोजीचेसह तालुक्मयातील नेते, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. साहाय्यक पोलीस आयुक्त बेळगाव ग्रामीणचे बी. एम.गंगाधर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Home महत्वाची बातमी हिंडलगा चेकपोस्ट नाक्यावर आंदोलन
हिंडलगा चेकपोस्ट नाक्यावर आंदोलन
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कार्यकर्ते एकवटले वार्ताहर /उचगाव कर्नाटक राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ तालुका भाजपा मंडळातर्फे दि. 20 जून रोजी सकाळी हिंडलगा फॉरेस्ट चेकपोस्ट नाक्मयावर भाजपा कार्यकर्ते व नेते मंडळींनी आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी हिंडलगा फॉरेस्ट चेकपोस्ट नाक्मयापासून सुळगा पेट्रोल पंपापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना थांबावे लागले. काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांनी पाच गॅरंटी योजना […]