मालदीवच्या प्रॉसिक्युटर जनरलवर हातोड्याने वार

भारत समर्थक सोलिह यांनी केली होती नियुक्त्री वृत्तसंस्था/ माले मालदीवचे प्रॉसिक्युटर जनरल हुसैन शमीम यांच्यावर हल्ला झाला आहे. शमीम यांच्यावर चाकू, हातोड्याने वार करण्यात आले आहेत. हल्ल्यात जखमी हुसैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हुसैन शमीम यांना मालदीवमधील मागील सोलिह सरकारने प्रॉसिक्युटर जनरल म्हणून नियुक्त केले होते. हुसैन यांना नियुक्त करणारा एमडीपी आता विरोधी […]

मालदीवच्या प्रॉसिक्युटर जनरलवर हातोड्याने वार

भारत समर्थक सोलिह यांनी केली होती नियुक्त्री
वृत्तसंस्था/ माले
मालदीवचे प्रॉसिक्युटर जनरल हुसैन शमीम यांच्यावर हल्ला झाला आहे. शमीम यांच्यावर चाकू, हातोड्याने वार करण्यात आले आहेत. हल्ल्यात जखमी हुसैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हुसैन शमीम यांना मालदीवमधील मागील सोलिह सरकारने प्रॉसिक्युटर जनरल म्हणून नियुक्त केले होते. हुसैन यांना नियुक्त करणारा एमडीपी आता विरोधी पक्षात असून अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या विरोधात महाभियोग आणण्याची तयारी करत आहे. एमडीपीला भारत समर्थक तर मुइज्जू यांना चीनधार्जिणे मानले जाते.
शमीम यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हल्लेखोराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू असून लवकरच आरोपीला अटक करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मालदीवमध्ये अलिकडच्या काळात राजकीय उलथापालथीदरम्यान राजकीय नेत्यांवरील हल्ले वाढले आहेत. अनेक खासदारांनाही रस्त्यांवर लक्ष्य करण्यात आले आहे. मुइज्जू आणि त्यांचे चीनधार्जिणे सरकार सत्तेवर आल्यापासून मालदीवमध्ये अराजकता आणि उग्रवादाच्या घटनांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.