ईडीकडून उत्तर प्रदेशात मालमत्ता जप्त
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश स्थित बाईक टॅक्सी पुरविणाऱ्या कंपनीची 5 कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) जप्त केली आहे. या कंपनीवर मनी लाँडरिंग आणि इतर प्रकरणांमध्ये यापूर्वीपासूनच कारवाई केली जात आहे. या कंपनीचे नाव हॅलो राईड कंपनी असे आहे. मालमत्तेवर टाच आणण्यापूर्वी न्यायालयाकडून तसा आदेश घेण्यात आला होता, असे स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी पूर्वीही मालमत्ता जप्त केली होती. आता या कंपनीची एकंदर साडेसात कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने ताब्यात घेतली असून अन्य मालमत्तांची माहिती मिळविण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक अभयकुमार कुशवाह, नीलम वर्मा, निखिल कुशवाह तसेच शकील अहमद, राजेश पांडे व रागिणी गुप्ता यांच्याविरोधात एफआयआर सादर झालेले आहेत.
Home महत्वाची बातमी ईडीकडून उत्तर प्रदेशात मालमत्ता जप्त
ईडीकडून उत्तर प्रदेशात मालमत्ता जप्त
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश स्थित बाईक टॅक्सी पुरविणाऱ्या कंपनीची 5 कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) जप्त केली आहे. या कंपनीवर मनी लाँडरिंग आणि इतर प्रकरणांमध्ये यापूर्वीपासूनच कारवाई केली जात आहे. या कंपनीचे नाव हॅलो राईड कंपनी असे आहे. मालमत्तेवर टाच आणण्यापूर्वी न्यायालयाकडून तसा आदेश घेण्यात आला होता, असे स्पष्ट करण्यात आले. या […]