क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा उत्सवाला चालना
जन्मस्थळ, समाधीस्थळाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन
बेळगाव : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णांचे जन्मस्थळ संगोळ्ळीचा व त्यांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या नंदगड परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. भविष्यात जास्त अनुदान देऊन या दोन्ही ठिकाणांचा विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने बैलहोंगल तालुक्यातील संगोळ्ळी येथे बुधवार दि. 17 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या संगोळ्ळी उत्सवाला चालना देऊन ते बोलत होते. संगोळ्ळी रायण्णांचे जन्मस्थळ व समाधीस्थळाच्या विकासासाठी 2016-17 मध्ये प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाला शंभर एकर जमीन देण्यात आली. 267 कोटी रुपये खर्च करून सैनिक शाळा, शिल्पग्राम उभारण्यात आले आहे. सैनिक शाळेत 230 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णांचे देशप्रेम प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. मुघल आणि इंग्रजांनी आपल्या स्वबळावर भारतावर राज्य केले नाही. आपल्यामध्ये फूट पाडून त्यांनी आमच्यावर राज्य केले. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, याचा विसर पडू नये. सुरपूरचे व्यंकटप्पा नायक, हलगलीचे बेडर टिपू सुल्तान, कित्तूर चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा अशा अनेकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्यांचे देशप्रेम वाखाणण्याजोगे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकीहोळी, निरंजनानंद पुरी स्वामीजी, गुरुलिंग शिवाचार्य स्वामीजी, मडिवाळ राजयोंगिद्र स्वामीजी, मंत्री भैरती सुरेश, खासदार मंगला अंगडी, आमदार राजू सेठ, गणेश हुक्केरी, शिवराज तंगडगी, आमदार महांतेश कौजलगी, एच. वाय. मेटी, अशोक पट्टण, माजी मंत्री एच. एम. रेवण्णा, माजी आमदार अंजली निंबाळकर, प्रकाश हुक्केरी, बाबासाहेब पाटील, महेंद्र तम्मण्णावर, विश्वास वैद्य, विधान परिषद सदस्य नागराज यादव, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा उत्सवाला चालना
क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा उत्सवाला चालना
जन्मस्थळ, समाधीस्थळाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन बेळगाव : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णांचे जन्मस्थळ संगोळ्ळीचा व त्यांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या नंदगड परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. भविष्यात जास्त अनुदान देऊन या दोन्ही ठिकाणांचा विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने बैलहोंगल तालुक्यातील […]