प्रो लीग : भारताचा आयर्लंडवर धडपडत 1-0 ने विजय

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर एफआयएच प्रो लीगमधील सामन्यात शेवटच्या मिनिटाला गुरजंत सिंगने केलेल्या गोलमुळे निराश भारतीय पुरुष हॉकी संघ बरोबरीवर समाधान मानण्याची पाळी येण्यापासून वाचला. अखेरीस आपल्याहून खालच्या क्रमांकावर असलेल्या आयर्लंडचा त्यांनी 1-0 ने पराभव केला. आयर्लंडने सामन्याच्या बहुतेक भागांमध्ये भक्कम बचाव करून भारतीयांना निराश केले. परंतु गुरजंतने 60 व्या मिनिटाला हाणलेल्या शक्तिशाली फटक्याने आयरिश गोलरक्षकाला चकविले. […]

प्रो लीग : भारताचा आयर्लंडवर धडपडत 1-0 ने विजय

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
एफआयएच प्रो लीगमधील सामन्यात शेवटच्या मिनिटाला गुरजंत सिंगने केलेल्या गोलमुळे निराश भारतीय पुरुष हॉकी संघ बरोबरीवर समाधान मानण्याची पाळी येण्यापासून वाचला. अखेरीस आपल्याहून खालच्या क्रमांकावर असलेल्या आयर्लंडचा त्यांनी 1-0 ने पराभव केला. आयर्लंडने सामन्याच्या बहुतेक भागांमध्ये भक्कम बचाव करून भारतीयांना निराश केले. परंतु गुरजंतने 60 व्या मिनिटाला हाणलेल्या शक्तिशाली फटक्याने आयरिश गोलरक्षकाला चकविले.
भारताला या सामन्यात मिळालेल्या सहापैकी एकाही पेनल्टी कॉर्नरचे गोलामध्ये ऊपांतर करता आले नाही. चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या तुलनेत 11 व्या क्रमांकावर असलेल्या आयर्लंडला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. भारतीयांची सुऊवात खराब झाली आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या 10 गोलांच्या थ्रिलरमध्ये त्यांनी जशी ऊर्जा दाखविली होती तशी ती येथे दिसून आली नाही. दुसरीकडे, आयर्लंडकडे अधिक चेंडूचा ताबा राहिला आणि आपल्या गोलक्षेत्रात आलेल्या भारतीयांकडील चेंडू हिरावून घेण्यात वा त्यांच्या चाली निष्फळ करण्यात ते यशस्वी झाले.
भारताला पहिली खरी संधी पेनल्टी कॉर्नरच्या रूपाने मिळाली होती, पण कर्णधार हरमनप्रीत सिंगचा फटका एका सतर्क आयरिश बचावपटूमुळे गोललाईनवर अडविला गेला. दुसरीकडे, 11 व्या मिनिटाला आयर्लंडला पहिली संधी मिळाली होती. पण मॅथ्यू नेल्सनचा रिव्हर्स हिट भारताचा गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकने रोखला. दुसऱ्या सत्रामध्ये भारतीयांनी खूपच चांगला खेळ केला. त्यांनी चेंडूवर अधिक नियंत्रण ठेवत हळूहळू पुनरागमन केले. भारताने यावेळी पाच मिनिटांच्या कालावधीत आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु दोन्ही प्रसंगी हरमनप्रीत आयर्लंडच्या गोलरक्षकाला चकवू शकला नाही.
मध्यांतराला दोन मिनिटे असताना सुखजित सिंग आणि अरैजीत सिंग हुंदल यांना दोन चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पण सुखजितचा प्रयत्न दिशाहीन ठरला, तर हुंडलचा फटका प्रतिस्पर्धी गोलरक्षक जेमी कारने अडविला. मध्यांतरानंतरही भारताचा संघर्ष चालूच राहून अनेकदा आयरिश गोलक्षेत्रात प्रवेश करूनही त्यांचा बचावाला भेदण्यात ते अपयशी ठरले. भारताचा पुढील सामना रुरकेला येथे 19 फेब्रुवारीला स्पेनशी होणार आहे.