प्रियांशू राजावत उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/कॅलगेरी (कॅनडा)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कॅनडा खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा प्रियांशू राजवतने पुरूष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे महिला दुहेरीत त्रिचा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरूष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या सामन्यात 39 व्या मानांकित राजवतने जपानच्या 33 व्या मानांकित तेकुमा ओबायेशीचा केवळ 38 मिनिटांच्या कालावधीत 21-19, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. राजवतचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना डेन्मार्कच्या टॉपसिडेड अॅंडर्स अॅन्टोनसेन बरोबर होणार आहे.
महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या त्रिचा आणि गायत्री या जोडीने डेन्मार्कच्या नताशा अॅन्थोनसेन व हॉलंडच्या टी. अॅलीसा यांचा 17-21, 21-7, 21-8 असा पराभव केला. हा सामना 48 मिनिटे झाला. त्रिचा आणि गायत्री यांचा पुढील फेरीतील सामना चीन तैपेईच्या पेई हेस आणि हुंग यांच्याबरोबर होईल. महिला एकेरीमध्ये भारताच्या अनुपमा उपाध्याय आणि तानिया हेमंत यांना दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. कॅनडाच्या लीने अनुपमाचा 21-14, 17-21, 21-13 तर थायलंडच्या बुसानने तानियाचा 21-11, 21-13 असा पराभव केला. पुरूष दुहेरीत भारताच्या कृष्णप्रसाद गरग आणि साई प्रतिक यांना चीन तैपेईच्या लीन आणि सु यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन कपूर आणि ऋत्विका ग•s यांचे आव्हानही समाप्त झाले.
Home महत्वाची बातमी प्रियांशू राजावत उपांत्यपूर्व फेरीत
प्रियांशू राजावत उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/कॅलगेरी (कॅनडा) विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कॅनडा खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा प्रियांशू राजवतने पुरूष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे महिला दुहेरीत त्रिचा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. पुरूष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या सामन्यात 39 व्या मानांकित राजवतने जपानच्या 33 व्या मानांकित तेकुमा ओबायेशीचा केवळ 38 मिनिटांच्या कालावधीत 21-19, […]