प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित
मंत्री सतीश जारकीहोळी यांना विश्वास
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या विजयानंतर आपल्यावरील जबाबदारी आणखी वाढणार आहे, असे जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. हुक्केरी येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये ते बोलत होते. गेल्या 30 वर्षांपासून आपण जनतेच्या संपर्कात असून जनतेच्या समस्यांचे निराकरण करत आहोत. प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयानंतर आपल्यावरील जबाबदारी वाढणार असून कार्यक्षेत्राचाही विस्तार होणार आहे, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याचा विश्वास आहे. यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे. विजयानंतर 8 विधानसभा मतदारसंघांतील नेते, जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच नाही तर धर्मावर आधारित राजकारणालाही विरोध केला आहे. विकासकामे करणाऱ्यांना समर्थन द्यायचा सर्वांचा निर्णय होता. प्रियांका जारकीहोळी यांना तिकीट मिळाल्यानंतर हा आवाज आणखी वाढला आहे. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही आपणाला समर्थन दिले, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री शशिकांत नाईक, हुक्केरी ब्लॉक अध्यक्ष विजय रवदी, महांतेश मगदूम आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित
प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित
मंत्री सतीश जारकीहोळी यांना विश्वास बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या विजयानंतर आपल्यावरील जबाबदारी आणखी वाढणार आहे, असे जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. हुक्केरी येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये ते बोलत होते. गेल्या 30 वर्षांपासून आपण जनतेच्या संपर्कात असून जनतेच्या समस्यांचे […]