प्रितम, सौजन्य, नक्षत्रा, सत्यम, निर्मला,अभिषेक योगा स्पर्धेत विजेते

राष्ट्रीय योगा स्पर्धा : सोलो स्पर्धेत नक्षत्रा, सुरेखा, मेघा, सुजल अजिंक्य बेळगाव : केएलएस आयएमईआर आयोजित राष्ट्रीय स्तरीय योगासन स्पर्धेत प्रितम वागूकर, संजना दोर्गी, सत्यम खांडेकर, अभिषेक हेगडे, निरक्षता डोलीन, निर्मला कोडलीकर यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. तर सोलो आर्टिस्ट विभागात नक्षत्रा शेट्टी, सुजल सुतार हिने विजेतेपद पटकाविले. आयएमईआर मॅनेजमेंट महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय योगासन स्पर्धेत जवळपास 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे हायस्कूल विभाग मुले गटात प्रितम वागूकर […]

प्रितम, सौजन्य, नक्षत्रा, सत्यम, निर्मला,अभिषेक योगा स्पर्धेत विजेते

राष्ट्रीय योगा स्पर्धा : सोलो स्पर्धेत नक्षत्रा, सुरेखा, मेघा, सुजल अजिंक्य
बेळगाव : केएलएस आयएमईआर आयोजित राष्ट्रीय स्तरीय योगासन स्पर्धेत प्रितम वागूकर, संजना दोर्गी, सत्यम खांडेकर, अभिषेक हेगडे, निरक्षता डोलीन, निर्मला कोडलीकर यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. तर सोलो आर्टिस्ट विभागात नक्षत्रा शेट्टी, सुजल सुतार हिने विजेतेपद पटकाविले. आयएमईआर मॅनेजमेंट महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय योगासन स्पर्धेत जवळपास 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे
हायस्कूल विभाग मुले गटात प्रितम वागूकर प्रथम क्रमांक, ओमकार निसर्गी दुसरा क्रमांक, प्रितम गोडगेरी तिसरा क्रमांक, मुलींचा गट सौजन्य दोर्गी प्रथम, सुहानी वेर्णेकर दुसरा, आर्या प्रभू तिसरा क्रमांक पटकाविला. पदवीपूर्व महाविद्यालय विभागात मुलींच्या गटात निरक्षता डोलीन प्रथम क्रमांक, अक्षा हडपद दुसरा क्रमांक, सुषमा बुलबुले तिसरा क्रमांक तर मुलांच्या विभागात सत्यम खांडेकर प्रथम क्रमांक, महेश काकतीकर दुसरा क्रमांक, भाऊ सासोलकर तिसरा क्रमांक, पदवीधर विभागात मुलींच्या गटात निर्मला कोडलीकर प्रथम क्रमांक, नक्षत्रा शेट्टी दुसरा क्रमांक, सविता कोडलीकर तिसरा क्रमांक, पुरूष विभागात अभिषेक हेगडे प्रथम क्रमांक, संजू घोडगेरी दुसरा क्रमांक, निराज नायर तिसरा क्रमांक पटकाविला.
सोलो आर्टिस्टीक विभागात मुलींच्या हायस्कूल विभागात नक्षत्रा शेट्टी प्रथम क्रमांक,पदवीपूर्व विभागात सुरेखा भाविनमरद तर पदवीधर गटात मेघा किटाली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर मुलांच्या विभागात सुजल सुतारने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे आयएमईआरचे डायरेक्टर अरिफ शेख, अमोल नाईक, डॉ. जॉर्ज रॉड्रिग्स यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना 2500, 1500, 1000 रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रमुख पंच म्हणून मुरलीधर प्रभू, आरती पडलगी, विश्वनाथ मनगुतकर, संजू बेलीकोप्पी, किसन थोरात, बसाप्पा बी., श्रीशैल गोपालशेट्टी यांनी काम पाहिले.