पिकुळे शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार उद्या
दोडामार्ग – वार्ताहर
श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे या शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल सदाशिव गवस ह्या आज दि. ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सत्कार आणि शुभेच्छा प्रदान कार्यक्रम देखील आज आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे या शाळेत आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी त्यांच्या ३३ वर्षाच्या सेवा कार्याचा गौरव करुन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या समारंभाला सर्वांनी उपस्थिती राहावे असे आवाहन धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई., पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई., श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे., शालेय समिती, पालक-शिक्षक संघ, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, पिकुळे, झरेबांबर ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि हितचिंतक आदींनी केले आहे.
Home महत्वाची बातमी पिकुळे शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार उद्या
पिकुळे शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार उद्या
दोडामार्ग – वार्ताहर श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे या शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल सदाशिव गवस ह्या आज दि. ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सत्कार आणि शुभेच्छा प्रदान कार्यक्रम देखील आज आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे या शाळेत आयोजित करण्यात आला आहे. या […]