मंदिर उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीला जाणार
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे एका भव्य हिंदू मंदिराचे निर्माणकार्य करण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा दौरा दोन दिवसांचा असून ते 14 फेब्रुवारीला या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
या मंदिराला अबुधाबी प्रशासनाने भूखंड दिला आहे. हे या देशातील प्रथमच हिंदू मंदिर आहे. 2015 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत संयुक्त अरब अमिरातीचा 6 वेळा दौरा केला असून ही सातवी वेळ आहे. या दौऱ्यात ते अबुधाबीचे राजे शेख मोहम्मद बिन झायेद अल् निहयान यांची भेट घेणार असून त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारकडून शनिवारी देण्यात आली आहे.
दुबई येथे परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबई येथेही जाणार असून तेथे आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेचे निमंत्रण त्यांना अबुधाबीच्या प्रमुखांनी दिले आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रमुख भाषण होणार असून त्यानंतर ते भारतात परत येणार आहेत.
Home महत्वाची बातमी मंदिर उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीला जाणार
मंदिर उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीला जाणार
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे एका भव्य हिंदू मंदिराचे निर्माणकार्य करण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा दौरा दोन दिवसांचा असून ते 14 फेब्रुवारीला या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या मंदिराला अबुधाबी प्रशासनाने भूखंड दिला आहे. […]