मलेशियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
पंतप्रधान इब्राहिम यांच्यासोबत कारमधून प्रवास : भारतीय वंशाच्या लोकांना केले संबोधित
वृत्तसंस्था/ क्वालांलपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मलेशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर क्वालांलपूर येथे पोहोचले. या दौऱ्यादरम्यान मलेशियन पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी वैयक्तिक स्वरुपात विमानतळावर त्यांचे स्वागत केले, यातून दोन्ही नेत्यांदरम्यानचे दृढ वैयक्तिक संबंध दिसून येतात. विमानतळावर सांस्कृतिक स्वागतही करण्यात आले, ज्यात भारत आणि मलेशियाच्या संयुक्त वारशाला दाखविण्यात आले. मलेशियातील मुलांनी दोन्ही देशांचे ध्वज फडकवत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
माझे मित्र अन्वर इब्राहिम यांच्याकडून करण्यात आलेल्या उत्साहपूर्ण स्वागतामुळे प्रभावित झालो आहे. भारत-मलेशियादरम्यान मैत्री आणखी मजबूत करण्यासाठी उत्सुक असल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत. 2015 नंतरचा पंतप्रधान मोदींचा मलेशियाचा हा तिसरा दौरा असून हा अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानुसार होतोय.
विमानतळावरून दोन्ही पंतप्रधान एकाच कारमधून प्रवास करत क्वालांलपूर येथील सामुदायिक कार्यक्रमाच्या दिशेने रवाना झाले. या कार राइडमध्ये दोन्ही नेत्यांदरम्यान वैयक्तिक संबंध आणि लोकांशी असलेला संपर्क स्पष्ट झाला. पंतप्रधान मोदींनी अन्वर इब्राहिम यांच्यासोबतचे कारमधील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
800 डान्सर्सचा कार्यक्रम
हा सामूदायिक कार्यक्रम ‘सेलामत दतंग मोदीजी’ नावाने माइन्स इंटरनॅशनल इक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित झाला. भारतीय वंशाच्या लोकांकडून आयोजित या कार्यक्रमात जवळपास 800 डान्सर्सनी जवळपास 5 मिनिटांपर्यंत कोरियोग्राफ्ड डान्स सादर केले, ज्यात भारतीय शास्त्राrय आणि लोकनृत्यांची विविधता दर्शविण्यात आली. हा मलेशिया बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये स्थान मिळविण्याचा प्रयत्न होता. कार्यक्रमात भारतीय वंशाचे हजारो लोक सामील झाले, जे भारत-मलेशियाच्या सांस्कृतिक आणि लोकांदरम्यान संबंधांना मजबूत करण्याचे माध्यम ठरले. पंतप्रधान मोदींनी यावेळी भारतीय वंशाच्या लोकांसोबत संवाद साधला आहे.
भारत-मलेशिया संबंध
हा दौरा 2024 मध्ये स्थापित भारत-मलेशिया कॉम्प्रिहेंसिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला नवा वेग देण्याची संधी आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चा करणार असून यात राजनयिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि लोकांमधील सहकार्यावर जोर असणार आहे. मलेशिया भारताचे अॅक्ट ईस्ट धोरण, व्हिजन महासागर आणि हिंद-प्रशांत व्हिजनमध्ये महत्त्वाचा भागीदार आहे. हा दौरा दोन्ही देशांदरम्यान बहुआयामी भागीदारी आणखी दृढ करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी आणि सांस्कृतिक बंधांला प्रोत्साहन देणार आहे.
Home महत्वाची बातमी मलेशियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
मलेशियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
पंतप्रधान इब्राहिम यांच्यासोबत कारमधून प्रवास : भारतीय वंशाच्या लोकांना केले संबोधित वृत्तसंस्था/ क्वालांलपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मलेशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर क्वालांलपूर येथे पोहोचले. या दौऱ्यादरम्यान मलेशियन पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी वैयक्तिक स्वरुपात विमानतळावर त्यांचे स्वागत केले, यातून दोन्ही नेत्यांदरम्यानचे दृढ वैयक्तिक संबंध दिसून येतात. विमानतळावर सांस्कृतिक स्वागतही करण्यात आले, ज्यात भारत आणि मलेशियाच्या संयुक्त […]
