भाज्यांचे दर कडाडले ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

सावंतवाडी अलीकडे उष्णतेच्या झळा वाढल्या असून या उकाड्यात नागरिक देखील हैराण होत आहेत. जून महिन्याला सुरुवात होऊन बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र जून महिन्यात वाढलेले तापमान आणि दुसरीकडे पडत असलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होत असून भाजीपाला सध्या कडाडला आहे. पुढील काही दिवसात भाजीपाल्याचे दर अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. […]

भाज्यांचे दर कडाडले ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

सावंतवाडी
अलीकडे उष्णतेच्या झळा वाढल्या असून या उकाड्यात नागरिक देखील हैराण होत आहेत. जून महिन्याला सुरुवात होऊन बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र जून महिन्यात वाढलेले तापमान आणि दुसरीकडे पडत असलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होत असून भाजीपाला सध्या कडाडला आहे. पुढील काही दिवसात भाजीपाल्याचे दर अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून भाजी कमी होणार की काय , हा प्रश्न पडला आहे. भाजीपाल्यांचे दर सध्या वाढले असून सध्या बाजारात हिरवी मिरची प्रति किलो 100 शंभर रुपये दराने विकली जात आहे. तर कोथिंबीर ची जुडी 60 रुपये दराने विकली जात आहे. कांदे प्रति किलो 40 रुपये, भेंडी प्रति किलो 60रुपये, फरसबी प्रति किलो २०० रुपयांनी विकली जात आहे. बटाटे प्रति किलो ५० रुपये, ढोबळी मिरची प्रति किलो 120 रुपये, कोबी प्रति किलो साठ रुपये, भेंडी प्रति किलो साठ रुपये तर वांगी प्रति किलो 80 रुपयांनी विकली जात आहेत. दुसरीकडे जास्त तापमानामुळे पालेभाज्याही शेतातच सडून गेल्या आहेत. अशी माहिती सावंतवाडी येथील भाजी व्यवसायिक इम्रान नेसरगी यांनी दिली.
जून महिन्याला सुरुवात झाली आहे. परंतु असे असले तरी नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. तसेच ज्या भागात भाजी पिकते त्या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असल्याने त्याचा पिकांवर परिणाम होतोय. कडक उन्हामुळे भाज्यांचे उत्पादन घटले असून त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक देखील कमी आहे. परिणामी मागणी वाढल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाजीपाल्यांचे दर वाढले असून सर्वच भाज्या पन्नास रुपयांच्या पुढे प्रति किलोने विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.