यल्लम्मा डोंगरावर पाच लाख भाविकांची उपस्थिती

तीन-चार तास रांगेत उभे राहून देवीचे दर्शन बाळेकुंद्री : कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी  शुक्रवारी व शनिवारी दर्शन घेतले. ‘उदो ग आई उदो’च्या गजरात, ढोल-ताशांच्या तालात व भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरश: उजळून गेला होता. गुऊवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त  डोंगरावर […]

यल्लम्मा डोंगरावर पाच लाख भाविकांची उपस्थिती

तीन-चार तास रांगेत उभे राहून देवीचे दर्शन
बाळेकुंद्री : कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी  शुक्रवारी व शनिवारी दर्शन घेतले. ‘उदो ग आई उदो’च्या गजरात, ढोल-ताशांच्या तालात व भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरश: उजळून गेला होता. गुऊवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त  डोंगरावर बेळगाव, धारवाड, गदग, बागलकोट जिल्ह्यांसह इतर राज्यांतील पाच लाखांहून अधिक भाविकांचा अथांग जनसागर लोटला होता. गुरुवारी पहाटेपासूनच बस, कार, टमटम रिक्षा, टॅक्टर, मोटारसायकल आदी वाहनांसह भाविक देवीच्या दर्शनाला येत असलेले चित्र पाहावयास मिळत होते. देवीच्या दर्शनासाठी दोन-चार तास रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांनी तऊण भारतशी बोलताना दिली. गुरुवारी मिरवणूक काढून ढोल-ताशांच्या तालात व अबिर भंडाऱ्याची उधळण भाविकांकडून डोंगर परिसरात होत होती. डोंगराच्या विस्तीर्ण परिसरात बैलगाड्यांसह तळ ठोकलेल्या भाविकांनी पहाटेच देवीचे दर्शन घेतले. यात्रेच्या मुख्य दिवशी देवीची विधिवत पूजा करून देवीला अभिषेक, होम, विशेष पूजा, आरती आदी धार्मिक विधी पार पडले. गुरुवारी पहाटे हुली गावचे हिरेमठ बंधू स्वामीजी व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवीची विधिपूर्वक पूजा झाल्यानंतर भाविकांना देवीच्या दर्शनाचा मार्ग मोकळा करून देण्यात आला.