आरोग्य स्थायी समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू

कौन्सिल विभागाचे प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशाकडे लक्ष  बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कौन्सिल विभागाने त्याबाबत कागदपत्रांची जुळवाजुळव आणि तयारी सुरू केली आहे. मनपा आयुक्तांनी प्रादेशिक आयुक्तांकडे निवडणूक घेण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच तातडीने ही निवडणूक घेणार असल्याचे कौन्सिल विभागाचे जे. महेश यांनी सांगितले. महानगरपालिकेतील स्थायी समितींची मुदत संपली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता […]

आरोग्य स्थायी समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू

कौन्सिल विभागाचे प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशाकडे लक्ष 
बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कौन्सिल विभागाने त्याबाबत कागदपत्रांची जुळवाजुळव आणि तयारी सुरू केली आहे. मनपा आयुक्तांनी प्रादेशिक आयुक्तांकडे निवडणूक घेण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच तातडीने ही निवडणूक घेणार असल्याचे कौन्सिल विभागाचे जे. महेश यांनी सांगितले. महानगरपालिकेतील स्थायी समितींची मुदत संपली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे ही निवडणूक घेणे अशक्य झाले. आचारसंहिता संपताच प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रादेशिक आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर निवडणूक घेतली जाणार आहे. कौन्सिल विभागाने या निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. 1 जुलैच्या दरम्यान ही निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महानगरपालिकेमध्ये एकूण चार स्थायी समित्या आहेत. त्या प्रत्येक स्थायी समितीमध्ये सात नगरसेवकांचा समावेश असतो. त्यामधून एक चेअरमन निवडला जातो. या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच ही निवडणूक होणार असल्याचे दिसून येत आहे.