थिएटर कमांड लागू करण्याची तयारी

सीडीएस चौहान यांचे वक्तव्य : तिन्ही दलांनी मिळून काम करण्याची संस्कृती तयार करावी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सशस्त्र दलांना थिएटर कमांडच्या अंतर्गत एकीकृत करण्याची तयारी सुरू आहे. थिएटर कमांडची स्थापना सैन्यतयारींना पुढील टप्प्यावर नेणार आहे. तिन्ही संरक्षण दलांना मिळून काम करण्याची संस्कृती विकसित करण्याची गरज आहे. थिएटर कमांडची स्थापना अंतिम नसेल, तर ही सैन्य सुधारणांची सुरुवात […]

थिएटर कमांड लागू करण्याची तयारी

सीडीएस चौहान यांचे वक्तव्य : तिन्ही दलांनी मिळून काम करण्याची संस्कृती तयार करावी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सशस्त्र दलांना थिएटर कमांडच्या अंतर्गत एकीकृत करण्याची तयारी सुरू आहे. थिएटर कमांडची स्थापना सैन्यतयारींना पुढील टप्प्यावर नेणार आहे. तिन्ही संरक्षण दलांना मिळून काम करण्याची संस्कृती विकसित करण्याची गरज आहे. थिएटर कमांडची स्थापना अंतिम नसेल, तर ही सैन्य सुधारणांची सुरुवात असेल असे उद्गार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले आहेत.
थिएटर कमांडच्या अंतर्गत तिन्ही संरक्षण दलांच्या कमांडचे एकीकरण होणार आहे. तसेच मल्टी डोमेन ऑपरेशन, अंतराळ आणि सायबर स्पेसचे वाढते महत्त्व, युद्धक्षेत्राचे डिजिटलीकरण अणि व्हिज्युअलायझेशन यासारख्या गोष्टी देखील असतील. मेजर जनरल समीर सिन्हा स्मृती व्याख्यानमालेतील स्वत:च्या संबोधनात सीडीएस अनिल चौहान यांनी यासंबंधी विचार मांडले आहेत. ‘संयुक्तता 1.0’ अंतर्गत तिन्ही कमांडमध्ये परस्पर समज वाढविण्यात आली आहे. आता संयुक्तता 2.0 अंतर्गत तिन्ही दलांमध्ये संयुक्त कार्यसंस्कृती विकसित करण्यावर जोर आहे. आम्ही प्रत्येक सेवेचे सर्वश्रेष्ठ प्राप्त करण्यास सक्षम असायला हवे असे चौहान यांनी म्हटले आहे.
थिएटर कमांडचे लाभ
सशस्त्र दलांच्या एकीकरणाच्या अंतर्गत प्रत्येक थिएटर कमांडमध्ये सैन्य, वायुदल आणि नौदलाच्या युनिट्स असतील आणि तिन्ही युनिट्स एकत्रितपणे एका निश्चित भौगोलिक क्षेत्रात काम करतील. सध्या तिन्ही दलांच्या कमांड वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत आहेत. थिएटर कमांडमुण्s तिन्ही दलांच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर होऊ शकणार आहे. थिएटर कमांड स्थापन झाल्याने ऑपरेशनल कमांडर केवळ सुरक्षा आव्हानांवर लक्ष देऊ शकतील आणि प्रशासकीय कामांपासून त्यांना वेगळे करता येणार आहे. जगभरातील अनेक देश सध्या आव्हानांना सामोरे जात आहेत. अशा स्थितीत भारतीय संरक्षण व्यव्सथेत सुधारणा आणि स्वत:च्या सुरक्षा आव्हानांची समीक्षा करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भविष्यातील लढाईचे स्वरुप बदलले असल्याचे उद्गार चौहान यांनी काढले आहेत.