Diwali Dhantrayodashi Puja: दिवाळीत धनत्रयोदशी पूजेसाठी खास प्रसादाची पाककृती

कोकोनट रबडी साहित्य- 1 लिटर क्रीम दूध अर्धा कप किसलेले नारळ अर्धा कप खवा साखर चवीनुसार काजू, वेलची, बदाम, पिस्ता केशर गुलाबाच्या पाकळ्या

Diwali Dhantrayodashi Puja: दिवाळीत धनत्रयोदशी पूजेसाठी खास प्रसादाची पाककृती

कोकोनट रबडी 

साहित्य- 

1 लिटर क्रीम दूध 

अर्धा कप किसलेले नारळ 

अर्धा कप खवा 

साखर चवीनुसार 

काजू, वेलची, बदाम, पिस्ता 

केशर 

गुलाबाच्या पाकळ्या 

 

कृती-

कोकोनट रबडी बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेलीत पाणी गरम करावे. त्यामध्ये काजू भिजत टाकून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवावे. मग पॅनमध्ये क्रिमी दूध घालून ते उकळवावे. दूध आटल्यानंतर त्यामध्ये केशर, खवा घालावा. नंतर भजवलेले काजू बारीक करून त्याची पेस्ट बनवावी. आता या मिश्रणामध्ये साखर आणि नारळाचा किस घालावा. मग नंतर काजूची पेस्ट घालावी. यानंतर वेलची घालून चांगल्याप्रकारे मिक्स करा. आता तयार झालेली रबडी थंड होऊ द्यावी. मग यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि कापलेला मेवा टाकून सजवावे. तर चला तयार आहे आपली चविष्ट, गोड कोकोनट रबडी जी सर्वांनाच आवडेल. 

 

कलाकंद 

साहित्य-

तीन कप- दूध

तीन चमचे- व्हिनेगर

एक कप- ताजे दूध

चार चमचे-साखर

दोन चमचे-तूप किंवा बटर

दोन चमचे- वेलची पूड

काजू

बदाम

 

कृती-

सर्वात आधी दूध उकळवा. दूध उकळले की पाणी आणि दूध वेगळे होतील. पण जर उकळल्यानंतरही छेना वेगळा झाला नाही तर तुम्ही त्यात लिंबू किंवा व्हिनेगर घालू शकता. पाण्यात व्हिनेगर मिसळा. आता ते कापडात गाळून वेगळे करा. यासाठी तुम्ही स्वच्छ आणि सुती कापडाचा वापर करावा. यानंतर,छेन्याला   चांगले पिळून घ्या. यामुळे छेन्यातील सर्व पाणी निघून जाईल. एका मोठ्या भांड्यात छेना ठेवा. आता ते हाताने मॅश करा. यानंतर या भांड्यात दोन चमचे दूध पावडर घाला. व त्यात २०० ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा. आता गॅसवर पॅन ठेवा. त्यात हे मिश्रण मिसळा. मंद आचेवर काही वेळ शिजवा. ते कडक होईपर्यंत शिजवा. एका गुळगुळीत प्लेटमध्ये कलाकंद काढा. ते व्यवस्थित सेट करा. अर्धा तास असेच राहू द्या. यानंतर त्याचे लहान तुकडे करा. आता कलाकंदला पिस्ता, बदाम आणि केशराने सजवा. तर चला तयार आहे आपली कलाकंद रेसिपी.  

 

केसर मलाई मालपुआ

साहित्य-

एक कप मैदा

अर्धा कप खवा

अर्धा कप दूध

दोन टेबलस्पून रवा

दोन चमचे दही

1/4 टीस्पून वेलची पूड

एक चिमूटभर केशर  

अर्धा टीस्पून बेकिंग पावडर

तळण्यासाठी तूप

एक कप साखर

3/4 कप पाणी

1/4  टीस्पून वेलची पावडर

एक टीस्पून गुलाब पाणी

अर्धा कप फ्रेश क्रीम

दोन टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क

एक टेबलस्पून पिठीसाखर

1/4 टीस्पून वेलची पावडर

बारीक चिरलेले बदाम

पिस्ता  

 

कृती-

सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, रवा आणि खवा घ्यावा. त्यामध्ये आता दही, दूध आणि वेलची पूड घाला आणि चांगले मिसळा. नंतर त्यात गुलाबजल आणि केशरयुक्त दूध घाला, ज्यामुळे पिठात  केशर रंग येईल. आता ते  ते चांगले फेटून घ्या आणि झाकून ठेवा जेणेकरून मिश्रण चांगले फुगेल. आता त्यात बेकिंग पावडर घाला आणि हलके मिक्स करा. एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून मंद आचेवर शिजवा. साखर विरघळली पाक तयार झाला की त्यात वेलची पूड, गुलाबपाणी आणि केशर घाला. ते गॅसवरून काढा आणि थोडे कोमट राहू द्या. आता एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि आच मध्यम ठेवा. तयार केलेले पीठ चमच्याच्या मदतीने गरम तुपात ओता आणि गोल मालपुआ बनवा.मालपुआ मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. तळलेले मालपुआ गरम पाकात दोन मिनिटे बुडवा जेणेकरून ते पूर्णपणे रसाने भरेल. सर्व मालपुआ काढा आणि एका प्लेटमध्ये ठेवा.

एका भांड्यात ताजी क्रीम, कंडेन्स्ड मिल्क, पिठीसाखर आणि वेलची पावडर एकत्र करा आणि चांगले फेटून घ्या. ते थंड राहण्यासाठी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. आता गरम मालपुआ एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर क्रीमचा थर घाला. बदाम, पिस्ता आणि केशर धाग्यांनी सजवा.  

 

केशरी पेढा

साहित्य-

खवा – दोन कप

साखर – अर्धा कप

केशर – 1/4 टीस्पून 

वेलची पूड -1/4 टीस्पून 

दूध 

 

कृती-

केशरी पेढा तयार करण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये खवा घ्यावा. व तो चांगल्या प्रकारे मोकळा करून घ्यावा. आता एका छोट्या बाऊलमध्ये केशरधागे घालावे. त्यामध्ये 1 चमचा दूध घालून केशर घोळून घ्यावे. आता एका नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेऊन खवा घालून भाजून घ्यावा. खवा 7 ते 8 मिनट पर्यंत भाजून घ्यावा. आता हा खवा एका प्लेटमध्ये पसरवून घ्यावा. व थंड होऊ द्यावा.15 मिनट नंतर त्यामध्ये वेलची पूड, केशर दूध आणि चवीनुसार साखर घालून चांगल्याप्रकारे मिक्स करावे. तसेच हा खवा अर्धा तास झाकण झाकून ठेऊन द्यावा. व नंतर कणिक मळतो तसा मळून घ्यावा. आता एक एक गोळा घेऊन त्याला तुम्हाला आवडेल तसा पेढयाचा आकार द्यावा. यानंतर प्रत्येक पेड्यावर एक किंवा दोन केशर धागे ठेवा आणि हलके दाबा. जेव्हा सर्व पेढे तयार होतील, तेव्हा ते पुन्हा एकदा चांगले झाकून ठेवा आणि 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून पेडे व्यवस्थित गोठतील. तर चला तयार आहे केशरी पेढा, चविष्ट केशरी पेढा नैवेद्यात नक्कीच ठेवा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: धनत्रयोदशीला भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीसाठी बनवा या रेसिपी

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: घरी बनवा स्वादिष्ट अशी गुलाब श्रीखंड पाककृती