प्रज्ञानंद-वेस्ली लढत बरोबरीत

वृत्तसंस्था/ बुखारेस्ट (रोमानिया) ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सुपरबेट क्लासिक स्पर्धेच्या पाचव्या फेरीत पुन्हा एकदा अमेरिकन वेस्लीविऊद्ध अनुकूल स्थिती गमावून शेवटी त्याच्यावर बरोबरीवर समाधान मानण्याची पाळी आली. या स्पर्धेत पाच सामन्यांपैकी एकाही लढतीचा निर्णायक निकाल लागला नाही. अमेरिकेचा फॅबियानो काऊआना 3.5 गुणांसह आघाडीवर कायम असून जागतिक स्पर्धेतील आव्हानवीर डी. गुकेश आणि प्रज्ञानंदवर त्याने अर्ध्या गुणाची आघाडी घेतलेली […]

प्रज्ञानंद-वेस्ली लढत बरोबरीत

वृत्तसंस्था/ बुखारेस्ट (रोमानिया)
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सुपरबेट क्लासिक स्पर्धेच्या पाचव्या फेरीत पुन्हा एकदा अमेरिकन वेस्लीविऊद्ध अनुकूल स्थिती गमावून शेवटी त्याच्यावर बरोबरीवर समाधान मानण्याची पाळी आली. या स्पर्धेत पाच सामन्यांपैकी एकाही लढतीचा निर्णायक निकाल लागला नाही. अमेरिकेचा फॅबियानो काऊआना 3.5 गुणांसह आघाडीवर कायम असून जागतिक स्पर्धेतील आव्हानवीर डी. गुकेश आणि प्रज्ञानंदवर त्याने अर्ध्या गुणाची आघाडी घेतलेली आहे.
अलिरेझा फिरोजा आणि मॅक्सिम वॅचियर-लाग्राव्ह या फ्रेंच जोडीने तसेच रशियाचा इयान नेपोम्नियाची आणि वेस्ली यांनी प्रत्येकी 2.5 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. हॉलंडचा अनीश गिरी आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह यांच्यापेक्षा ते अर्ध्या गुणाने पुढे आहेत. स्थानिक खेळाडू डीक बोगदान-डॅनियल अजूनही 1.5 गुणांसह तळाशी आहे.
गुकेश देखील अब्दुसत्तारोव्हविऊद्ध अनुकूल स्थितीत होता, पण ती स्थिती त्याच्या हातातून निसटली, तर वॅचियर-लाग्राव्हने काऊआनाला बरोबरीत रोखताना चांगला खेळ केला. बोगदान-डॅनियलने 10 खेळाडूंच्या या दुहेरी राऊंड-रॉबिन स्पर्धेत इयान नेपोम्नियाचीसोबत बरोबरी साधली. डावपेचांच्या बाबतीत सहसा कुशल दिसणाऱ्या प्रज्ञानंदने येथे फायदेशीर स्थिती गमावली आणि काही विजयी चालीही त्याला करता आल्या नाहीत. गुकेशविऊद्धचा सामना तांत्रिकदृष्ट्या जिंकण्याची संधी गमावलेला वेस्ली सो त्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजेल. खेळण्याच्या हॉलमध्ये गॅरी कास्पारोव्हच्या उपस्थितीने प्रेरित झालेल्या प्रज्ञानंदने काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना किंग्स इंडियन डिफेन्स निवडला होता.