रजत पाटीदारचे दमदार शतक

वृत्तसंस्था /अहमदाबाद येथे सुरू असलेल्या इंग्लंड लायन्स आणि भारत अ यांच्यातील पहिल्या अनाधिकृत कसोटी सामन्यात गुरूवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत अ संघाने पहिल्या डावात 8 बाद 215 धावा जमविल्या. भारत अ च्या डावामध्ये रजत पाटीदारने नाबाद शतक (140) झळकविले. मात्र या सामन्यावर इंडियन लायन्सने आपली स्थिती मजबूत केली आहे. या सामन्यात इंग्लंड लायन्स संघाने आपला […]

रजत पाटीदारचे दमदार शतक

वृत्तसंस्था /अहमदाबाद
येथे सुरू असलेल्या इंग्लंड लायन्स आणि भारत अ यांच्यातील पहिल्या अनाधिकृत कसोटी सामन्यात गुरूवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत अ संघाने पहिल्या डावात 8 बाद 215 धावा जमविल्या. भारत अ च्या डावामध्ये रजत पाटीदारने नाबाद शतक (140) झळकविले. मात्र या सामन्यावर इंडियन लायन्सने आपली स्थिती मजबूत केली आहे. या सामन्यात इंग्लंड लायन्स संघाने आपला पहिला डाव 8 बाद 553 धावांवर घोषित केला होता. इंग्लंड अ संघातील बोहानेनने 125, अॅलेक्स लिसने 73, मोस्लेने 68 तर कार्सनने 53 धावांचे योगदान दिले. भारत अ संघातर्फे मानव सुतारने 137 धावात 4 गडी बाद केले.
भारत अ संघाने आपल्या पहिल्या डावाला डळमळीत सुरूवात केली. मॅथ्यू फिशरच्या भेदक गोलंदाजीसमोर भारत अ संघाने पहिल्या डावात दिवस अखेर 8 बाद 215 धावा जमविल्या आहेत. रजत पाटीदारने शानदार नाबाद शतक (नाबाद 140) झळकवित भारत अ संघाचा डाव सावरला. इंग्लंड लायन्सच्या भेदक गोलंदाजीसमोर भारत अ संघाची स्थिती एकवेळ 7 बाद 95 अशी केविलवानी झाली होती. त्यानंतर रजत पाटीदार आणि तुषार देशपांडे यांनी संघाचा डाव सावरला. पाटीदारने 5 षटकार आणि 18 चौकारांसह 132 चेंडूत नाबाद 140 धावा जमविल्या असून तुषार देशपांडेने 23 धावा केल्या. इंग्लंड लायन्सच्या मॅट फिशरने 57 धावात 4 गडी बाद केले. तत्पूर्वी इंग्लंड लायन्सने 3 बाद 382 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांनी 118 षटकात 8 बाद 553 धावांवर डावाची घोषणा केली. जेनिंग्जने 154, बोहानेनने 125, लिसने 73, मोस्लिने 68 तसेच कार्सनने 53 धावांचे योगदान दिले. भारत अ संघातर्फे फिरकी गोलंदाज मानव सुतारने 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड लायन्स प. डाव 8 बाद 553 डाव घोषित (जेनिंग्ज 154, बोहानेन 125, लिस 73, मोस्ले 68, कार्सन 53, मानव सुतार 4-137), भारत अ प. डाव 40 षटकात 8 बाद 215 (रजत पाटीदार खेळत आहे 140, देशपांडे 23, फिशर 4-57).