शहराच्या दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 11 रोजी शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वीजपुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे. उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्स परिसर, राणी चन्नम्मानगर, बुडा ले-आऊट, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, अनगोळ औद्योगिक वसाहत, दामोदर कंपाऊंड, दो•ण्णावर कंपाऊंड, […]

शहराच्या दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 11 रोजी शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वीजपुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे. उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्स परिसर, राणी चन्नम्मानगर, बुडा ले-आऊट, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, अनगोळ औद्योगिक वसाहत, दामोदर कंपाऊंड, दो•ण्णावर कंपाऊंड, जीआयटी कॉलेज परिसर, राजारामनगर, महावीरनगर, खानापूर मुख्य रस्ता, पाटील मळा, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, भवानीनगर, राजीव गांधीनगर, साईप्रसाद ले-आऊट, नित्यानंद कॉलनी, गोडसेवाडी, नरगुंदकर कॉलनी, विश्वकर्मा कॉलनी, पोस्टल कॉलनी, जैतनमाळ या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
कणबर्गी भागात उद्या वीजपुरवठा खंडित
कणबर्गी येथील 110 केव्ही विद्युत उपकेंद्रामध्ये दुरुस्ती केली जाणार असल्याने रविवार दि. 11 रोजी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत वीजपुरवठा बंद केला जाणार आहे. कणबर्गी गावासह रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवण कुडची व ऑटोनगर या भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.