रिक्षा चालक संघटनेतर्फे श्रमदानातून बुजवले खड्डे

► प्रतिनिधी / बेळगाव रिक्षा चालक संघटनेतर्फे रविवारी राकसकोप रामघाट मार्गावरील बिस्कीट महादेव परिसरातील पडलेले खड्डे श्रमदानातून बुजविण्यात आले. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली होती. अनेकवेळा तक्रारी करूनदेखील संबंधितांचे दुल झाले होते. यामुळे रिक्षाचालक संघटनेने पुढाकार घेत स्वत:चं रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. या मार्गावर खड्डे पडल्याने राकसकोप, तुडये, बेळगुंदी, गणेशपूर भागात जाणाऱ्या […]

रिक्षा चालक संघटनेतर्फे श्रमदानातून बुजवले खड्डे

► प्रतिनिधी / बेळगाव
रिक्षा चालक संघटनेतर्फे रविवारी राकसकोप रामघाट मार्गावरील बिस्कीट महादेव परिसरातील पडलेले खड्डे श्रमदानातून बुजविण्यात आले. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली होती. अनेकवेळा तक्रारी करूनदेखील संबंधितांचे दुल झाले होते. यामुळे रिक्षाचालक संघटनेने पुढाकार घेत स्वत:चं रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत.
या मार्गावर खड्डे पडल्याने राकसकोप, तुडये, बेळगुंदी, गणेशपूर भागात जाणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावा. अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे याकडे दुल झाले होते. त्यामुळे रिक्षा चालकांनी एकत्रित येऊन सदर मार्गावरील खड्डे बुजविले आहेत.