4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला स्थगिती

बेंगळूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (एनईपी) चा भाग असलेल्या 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम स्थगित करण्याचा आदेश उच्चशिक्षण खात्याने दिला असून गेंधळ दूर केला आहे. राज्यातील उच्च शिक्षण संस्थामध्ये एनईपी जारी केल्यानंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी सहाव्या समिस्टरमध्ये आहेत. विद्यापीठांचे कुलगुरु, पदवी महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी सरकारला पत्र पाठवून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू ठेवावा का? […]

4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला स्थगिती

बेंगळूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (एनईपी) चा भाग असलेल्या 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम स्थगित करण्याचा आदेश उच्चशिक्षण खात्याने दिला असून गेंधळ दूर केला आहे. राज्यातील उच्च शिक्षण संस्थामध्ये एनईपी जारी केल्यानंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी सहाव्या समिस्टरमध्ये आहेत. विद्यापीठांचे कुलगुरु, पदवी महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी सरकारला पत्र पाठवून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू ठेवावा का? याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. आता नुकत्याच झालेल्या बैठकीतील चर्चेनंतर उच्चशिक्षण खात्याचे अधिकारी आणि राज्य उच्चशिक्षण परिषदेच्या सदस्यांनी ऑनर्स पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, सर्व विद्यार्थ्यांना सरकारच्या निर्णयाची माहिती द्यावी. याविषयी योग्य माहिती देण्याची सूचना उच्चशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत 8 मे रोजी अधिकृत आदेश जारी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखालील राज्य शिक्षण धोरण (एसईपी) आयोगाने सादर केलेल्या अंतरिम अहवालाच्या आधारे उच्चशिक्षण खात्याने चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण धोरण आयोग ऑगस्टमध्ये अंतिम अहवाल सादर करणार आहे.