मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत (mumbai) गुरूवारी सकाळपासून मुसळधार पाऊस (heavy rain) पडत असल्याने शहरातील काही भागात पाणी साचले आहे. गांधी मार्केट, दादर (Dadar), हिंदमाता, परळ (parel) , अंधेरी सबवे आणि सायन (sion) या सखल भागात पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. मात्र, पाणी साचल्याची कोणतीही बातमी नसल्याचे बीएमसीने म्हटले आहे. पश्चिम रेल्वे (western railway)आणि मध्य रेल्वेने (central railway) सांगितले की, लोकल गाड्या सुरळीत सुरू आहेत. मात्र मध्य रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा काही प्रवाशांनी केला. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पावसामुळे शहर आणि उपनगरात अद्याप बसचे मार्ग बदलले नाहीत. भारतीय हवामान खात्याने मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसानंतर बुधवारी सायंकाळपासून पावसाची तीव्रता वाढली असून, शहरामध्ये उपनगरांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत, शहरात सरासरी 83 मिमी पावसाची नोंद झाली, पूर्व भागात 45 मिमी आणि पश्चिम भागात 39 मिमी पाऊस झाला.हेही वाचा लोकप्रिय रील स्टार अनवी कामदारचा दरीत पडून मृत्यू वांद्रे-वरळी सीलिंकवरून उद्योजकाची आत्महत्या

मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत (mumbai) गुरूवारी सकाळपासून मुसळधार पाऊस (heavy rain) पडत असल्याने शहरातील काही भागात पाणी साचले आहे. गांधी मार्केट, दादर (Dadar), हिंदमाता, परळ (parel) , अंधेरी सबवे आणि सायन (sion) या सखल भागात पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतूक मंदावली आहे.मात्र, पाणी साचल्याची कोणतीही बातमी नसल्याचे बीएमसीने म्हटले आहे. पश्चिम रेल्वे (western railway)आणि मध्य रेल्वेने (central railway) सांगितले की, लोकल गाड्या सुरळीत सुरू आहेत. मात्र मध्य रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा काही प्रवाशांनी केला. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पावसामुळे शहर आणि उपनगरात अद्याप बसचे मार्ग बदलले नाहीत. भारतीय हवामान खात्याने मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसानंतर बुधवारी सायंकाळपासून पावसाची तीव्रता वाढली असून, शहरामध्ये उपनगरांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत, शहरात सरासरी 83 मिमी पावसाची नोंद झाली, पूर्व भागात 45 मिमी आणि पश्चिम भागात 39 मिमी पाऊस झाला.हेही वाचालोकप्रिय रील स्टार अनवी कामदारचा दरीत पडून मृत्यूवांद्रे-वरळी सीलिंकवरून उद्योजकाची आत्महत्या

Go to Source