चविष्ट खसखसची चटणी नक्की ट्राय करा
साहित्य-
अर्धा कप- खसखस
दोन- हिरव्या मिरच्या
लसूण पाकळ्या
लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
नारळ पावडर
चिमूटभर मोहरी
कढीपत्ता
आवश्यकतेनुसार पाणी
ALSO READ: अननसची चटणी रेसिपी
कृती-
सर्वात आधी रात्री अर्धा कप खसखस पाण्यात भिजवा. सकाळी पाणी गाळून मिक्सर जारमध्ये ठेवा आणि त्यात २ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या घाला आणि बारीक वाटून घ्या. आता चटणी एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घाला. जर तुम्ही खसखस पाण्यात भिजवायला विसरलात तर तुम्ही ही चटणी दुसऱ्या पद्धतीने बनवू शकता. अर्धा कप खसखस चांगले भाजून घ्या. आता ते मिक्सर जारमध्ये ठेवा, त्यात ३ चमचे नारळ पावडर, २ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या घाला आणि बारीक वाटून घ्या. आता चटणी एका भांड्यात काढा. वरून मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. तर चला तयार आहे आपली चविष्ट खसखसची रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: अक्रोड चटणी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik