पूजा धांडा लग्नाच्या बेडीत

वृत्तसंस्था / हिसार भारताची अर्जुन पुरस्कार विजेती महिला मल्ल पूजा धांडाचा विवाह नुकताच येथे एका खासगी रिसॉर्टमध्ये थाटात पार पडला. पूजाचे पती अभिषेक बोरा हे उद्योगपती आहेत. पूजा धांडाने 2018 साली बुडापेस्ट येथे झालेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत 57 किलो वजन गटात कांस्यपदक मिळविले होते तर 2010 साली झालेल्या उन्हाळी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत तसेच 2018 […]

पूजा धांडा लग्नाच्या बेडीत

वृत्तसंस्था / हिसार
भारताची अर्जुन पुरस्कार विजेती महिला मल्ल पूजा धांडाचा विवाह नुकताच येथे एका खासगी रिसॉर्टमध्ये थाटात पार पडला. पूजाचे पती अभिषेक बोरा हे उद्योगपती आहेत.
पूजा धांडाने 2018 साली बुडापेस्ट येथे झालेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत 57 किलो वजन गटात कांस्यपदक मिळविले होते तर 2010 साली झालेल्या उन्हाळी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत तसेच 2018 च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने रौप्य पदके पटकाविली होती. 2014 च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत पूजाने कांस्यपदक मिळविले होते. हरियाणा क्रीडा खात्यामध्ये पूजा धांडा ही सध्या वरिष्ठ कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.