शहरासह ग्रामीण भागात पोलिओ लसीकरणाला प्रारंभ
0 ते 5 वयोगटातील बालकांना डोस
बेळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात आली आहे. पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य खात्याकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेतून एकही बालक वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. रविवारी ग्रामीण भागातील विविध बुथवर मुलांना लस देण्यात आली. सोमवार आणि मंगळवार इतर ठिकाणी फिरून बालकांना डोस पाजला जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागात 0 ते 5 वयोगटातून बालकांची संख्या मोठी आहे. या सर्व बालकांना डोस पाजविण्याचे उद्दिष्ट आरोग्य खात्याने ठेवले आहे. याबाबत शाळा स्तरावर जागृती फेरी काढून गावोगावी जागृती केली आहे.
Home महत्वाची बातमी शहरासह ग्रामीण भागात पोलिओ लसीकरणाला प्रारंभ
शहरासह ग्रामीण भागात पोलिओ लसीकरणाला प्रारंभ
0 ते 5 वयोगटातील बालकांना डोस बेळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात आली आहे. पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य खात्याकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेतून एकही बालक वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. रविवारी ग्रामीण भागातील […]